शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कागलला आयुर्वेदिक, उत्तूरला योग, निसर्गोपचार महाविद्यालय मंजूर; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Updated: August 7, 2024 18:56 IST

वर्षभरात तीन रूग्णालये

कोल्हापूर : कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, संलग्न १०० रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि उत्तूर ता. आजरा येथे योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे हे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करुन घेण्यात येणार असून या महाविद्यालय, रूग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन निर्माण करण्यास व भरण्यासही तसेच बांधकाम आणि त्याच्या खर्चासही शासनाने मंजुरी दिली आहे.मुश्रीफ म्हणाले याबरोबरच उत्तूर, ता.आजरा येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रूग्ण खाटांच्या रूग्णालयासही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.  माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत यासाठी निकषानुसार आवश्यक व सुयोग्य जागा किमान ३ एकर निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात केंद्रीय संस्थेद्वारा नोंदणीकृत योग व निसर्गोपचार विषयक शिक्षण देणारी (पदविका / सर्टिफिकेट कोर्स) व उपचार करणाऱ्या एकुण पाच संस्था (केंद्रीय व खाजगी) कार्यरत आहेत. या संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बी.एन.वाय.एस. साठी विहीत केलेला ‘पदवी अभ्यासक्रम’ राबवित नाहीत. तसेच, महाराष्ट्र राज्यात योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे एकही शासकीय महाविद्यालय नाही. म्हणूनच उत्तूर, ता.आजरा येथे हे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयासाठी  आवश्यक असणारी पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने भरण्यास मान्यता देण्यात आले आहे. महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास  मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वर्षभरात तीन रूग्णालयेमुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर केवळ वर्षभरात आपल्या कागल मतदारसंघात तीन रूग्णालये आणि दोन महाविद्यालये मंजूर करून आणली आहेत. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत एक मोठे रूग्णालय त्यांनी आधीच कसबा सांगाव येथे मंजूर करून आणले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ