कोल्हापूर : अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांची कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांची ही विनंती बदली असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
मूळचे लातूरचे असलेले गिते यांनी सप्टेंबर १९९५ साली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून मोटार वाहन विभागात सेवेस सुरुवात केली. गेल्या पंचवीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अहमदनगर, लातूर, अमरावती, चंद्रपूर आदी ठिकाणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उठवलेला आहे. सध्या ते अमरावती येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून गेले तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. विनंतीवरून त्यांची बदली कोल्हापुरातील रिक्त जागी झाली. त्याच्या बदलीचे आदेश बुधवारी गृह विभागाचे अवर सचिव दीपक पोकळे यांनी काढले. गिते हे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांच्याकडून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
फोटो : २१०१२०२१-कोल-राजाभाऊ गिते