शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

राहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच ...

कोल्हापूर : गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार पी.एन. पाटील मुलगा राहूल , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद, आमदार प्रकाश आवाडे यांचा मुुलगा राहूल यांचा अर्ज नेणाऱ्यांत प्रामुख्याने समावेश आहे.

गोकूळ दूध संघाचे संचालकपद हे आमदारकीच्या तोलामोलाचे मानले जात असल्याने हे पद मिळावे यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसतात. पण कांही घराण्यांच्या मक्तेदारीमुळे येथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा शिरकाव करणे तसे महाकठीण असते. ही निवडणूक गटातंर्गत इर्ष्येंने आणि अंतर्गत खेळ्यांवर आधारीत लढवली जात असल्याने यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा टिका लागणेही तसे अशक्यच असते, त्यामुळे यंत्रणा हाताळण्यासाठी म्हणून बडे मातब्बर नेते व त्यांच्या वारसदारांचीच नावे पुढे केली जातात. यातूनच गोकूळची फळे चाखणारी म्हणून स्वतंत्र घराणीच जिल्ह्यात तयार झालेली दिसतात. यावर्षीची निवडणुकही याला अपवाद नाही. सत्ताधारी व विरोधी आघाडीही तुल्यबळ असल्यामुळे यावेळची निवडणुक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी वारसदारांचे पत्ते बाहेर काढले आहेत.

संचालक रामराजे कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आम्ही तर मागे का राहू असे म्हणून उमेदवारी अर्ज नेले आहेत.

चौकट ०१

शेवटी पालखीचे भोईच

नेते व त्यांच्या वारसदारांचे अर्ज नेण्यासाठी मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राबताना दिसत होती. नेते अर्ज भरत असताना कार्यकर्ते त्यांच्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. त्यामुळे कार्यकर्ते किती निष्ठावंत असलेतरी ते पालखीचे भोईच असतात, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.