शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विम्यासाठी विभागाकडून आवाहन

By admin | Updated: July 23, 2014 23:49 IST

उपविभागीय कृषी अधिकारी

कोल्हापूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत जुलैअखेर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाच्यावतीने रब्बी हंगाम १९९९-२००० पासून राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली. या हंगामासाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. भात, खरीप ज्वारी, नाचणा, तूर व उडीद, कारळा, भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, कांदा, ऊस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये सहभाग होऊ शकतो. सरासरी उत्पन्न व किमान आधारभूत किमतीशी निगडित विमा संरक्षित रक्कम हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण आहे. ऊस सोडून खरीप पिकांसाठी ३१ जुलै, तर आडसाली ऊस लागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पूर्वहंगामी उसासाठी लागवडीपासून एक महिना अथवा डिसेंबर २०१४, तर सुरू उसासाठी मार्च २०१५ पर्यंत मुदत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तलाठी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)