शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाणजी, ओएसडी यादव यांच्याशिवाय पालकमंत्री पाटील यांचे पानही हलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:37 IST

सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली.

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांचा खळबळजनक आरोप : दलित वस्ती निधीचा वाद

कोल्हापूर : दिवाणजी आणि ओएसडी बाळासाहेब यादव यांच्याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पानही हलत नाही, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत असाच आरोप केल्यानंतर पुन्हा मुश्रीफ यांनी पुनरुच्चार केल्याने हे दोघेही आता चर्चेत आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्तीच्या निधीवरून सुरू असलेल्या वादाबाबत जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडून पालकमंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांचा उल्लेख झाला. तेव्हा हसन मुश्रीफ उसळून म्हणाले, यादव म्हणजे काय पालकमंत्री आहेत काय, यादी द्यायला. त्यांच्याशिवाय आणि दिवाणजींशिवाय पालकमंत्र्यांचे पानही हलत नाही. येथील कावळा नाका रेस्ट हाऊसवरून यादवच सर्व सदस्यांना निधीबाबत फोन करतात, असाही मुद्दा यावेळी चर्चेतून पुढे आला.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांनी मंत्री पाटील यांच्यावर थेट आरोप करताना असाच आरोप केला होता. सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली.

कोण आहेत हे दोघेमहसूल खात्यामध्ये तलाठी म्हणून काम करणारे प्रकाश शिंदे यांना ‘दिवाणजी’ म्हणून ओळखले जाते. ते राधानगरी तालुक्यातील सावर्डे-पाटणकर गावचे आहेत. त्यांना १५ वर्षांपूर्वी लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यातूनच त्यांना निलंबितही करण्यात आले होते. त्याच काळामध्ये त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार असताना संपर्क आला. गेली साडेचार वर्षे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विविध शासकीय कामांचे व्यवस्थापन ते पाहतात, असे सांगण्यात येते. पांढरी इनोव्हा गाडी घेऊन फिरणारे ‘दिवाणजी’ मुंबईपर्यंत चर्चेत आले आहेत.

बाळासाहेब यादव हे गेली साडेचार वर्षे मंत्री पाटील यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहेत. ते सहकार विभागातील आॅडिट विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. मंत्री पाटील यांच्या कावळा नाका येथील संपर्क कार्यालयाचा कार्यभार त्यांच्याकडे असून, सर्व प्रशासकीय कामकाज त्यांच्यामार्फत होते. जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाच्या याद्या यादव यांनी तयार केल्याच्या आरोपामुळे ते चर्चेत आले आहेत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर