शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

आप्पाचीवाडी पहिली भाकणूकः चीन भारतावर हल्ला करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:34 IST

कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडून कर्नाटकातील चौथाई भाग ओसाड पडेल, असा धोक्याचा इशारा देतानाच जाती-धर्म बिघडून जाईल, वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील, चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल, असे भाकीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत करण्यात आले

ठळक मुद्देआप्पाचीवाडी पहिली भाकणूकः चीन राष्ट्रापासून भारताला धोकाश्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भौम यात्रा

दत्ता पाटीलम्हाकवे : कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडून कर्नाटकातील चौथाई भाग ओसाड पडेल, असा धोक्याचा इशारा देतानाच जाती-धर्म बिघडून जाईल, वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील, चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल, भगवा झेंडा डवलाने मिरवेल, असे भाकीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत करण्यात आलेश्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भौम यात्रा गेल्या मंगळवारपासून सुरू आहे. शुक्रवारी पहाटेच्या निरव शांततेत नाथांची पहिली भाकणूक संपन्न झाली. नाथांचे भक्त भगवान ढोणे-वाघापूरे यांच्या मुखातून ही भाकणूक कथन झाली.

यावेळी सीमाभागातील हजारो भाविक उपस्थित होते, या भाकणूकीबाबत भक्तांमध्ये उत्सुकता असते, भगवा झेंडा डवलाने मिरवेल, तर इतर पक्ष चिंतेत राहतील. राजकारणात उलथा-पालथी होत राहतील. भाविकांनी सांभाळून राहावे, माझं माझं म्हणत बसू नका, असा मौलिक सल्लाही दिला.  या यात्रेसाठी कागल,निपाणी, संकेश्वर, रायबाग, मुरगुड, चिक्कोडी येथून जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली.  शनिवारी पहाटे नाथांची दुसरी भाकणूक होणार असून सकाळी ८ वा. घुमट मंदिरातही नाथांची भाकणूक होणार आहे. तर, सायंकाळी ४.३० वा.पालखी प्रदक्षिणा व बागेवाडी येथिल मानकऱ्यांच्या हस्ते कर तोडून यात्रेची सांगता होणार आहे.नैतिकतेबरोबरच ऋतुचक्र बदलेल...संतांच्या पावन भुमीत  पापाचा घडा भरत चाललाय. भाऊ-बहिणीत प्रेमप्रकरणे होतील, ते लग्न करून घेतील. या नात्याला कलंक लागेल. तुम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहाल. लुगडी, घोंगडी, कपडे फुकट मिळतील, ऋतूचक्र बदलत जावून पीक पध्दतच बदलत जाईल, दीड महिना कालावधीचे धान्य पिकेल, दुध उत्पादक शेतकरी कर्जात राहिल तर मँनेजर मलई खात राहील.पाकिस्तानच्या चौथाई भागावर ताबा मिळेल...मराठा सैनिक मरणाला घाबरणार नाहीत. ते छातीची ढाल करून पाकिस्तानी सैन्याशी लढत राहतील. या लढाईत ते यशस्वी होवून पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या ताब्यात घेतील. जम्मू काश्मीरमध्ये भारत मातेचा जयजयकार होईल, असे भाकितही करण्यात आले.आप्पाचीवाडी येथिल श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेत पहाटेच्या निरव शांततेत भाकणूक कथन करताना भगवान ढोणे-वाघापूरे. यावेळी यावेळी सीमाभागातील हजारो भाविक उपस्थित होते. (छाया-मंगेश फोटो, आप्पाचीवाडी)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव