शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

जादूटोणाविरोधी कायद्याची कोल्हापुरात जनजागृती

By पोपट केशव पवार | Updated: October 12, 2023 18:42 IST

कोल्हापूर : जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेली जनसंवाद प्रबोधन यात्रा ...

कोल्हापूर : जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेली जनसंवाद प्रबोधन यात्रा बुधवारी कोल्हापुरात आली. गडहिंग्लजसह कोल्हापुर शहरातील अनेक शाळा-कॉलेजमध्ये या कायद्याची जनजागृती करण्यात आली. अनिसच्या अध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेसोबत सजवलेली गाडी आहे. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कलमे चित्रीत केली आहेत.जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याची अंमलबजावणी होऊन दहा वर्षे लोटली. त्यानुसार साडेबाराशे गुन्हे या कायद्याखाली नोंदवले. पण, अजूनही अंधश्रध्देचे प्रस्थ कमी होत नाही. गुप्तधनासाठी खून किंवा चेटूक भानामतीच्या संशयावरून मारहाण, खून, बहिष्कार हे प्रकार वाढत चालले आहेत. बऱ्याच ठिकाणी तपास अधिकाऱ्यांना या कायद्याची व्यवस्थित माहिती नाही. या कायद्याला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने कायद्याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा काढली आहे. २० ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण राज्यात जाणार आहे. कोल्हापुरात करवीर प्रशाला, शहाजी लॉ कॉलेज, प्रबुद्ध भारत हायस्कूल, गडहिंग्लजचे साधना हायस्कूल, शिवराज महाविद्यालय येथे या कायद्याबाबत प्रबोधन केले. यावेळभ समन्वयक नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, भगवान रणदिवे यांनी व्याख्यान तसेच चमत्काराचे प्रयोग करून कायद्याची माहिती सांगितली. रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण, प्रा. डॉ विलासराव पोवार, संजय सुळगावे, संजय आरदाळकर, आकाराम कांबळे, गीता हसुरकर, सीमा पाटील, माणिक यादव हे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले

टॅग्स :kolhapurकोल्हापूर