शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

भोंदूच्या लोलकविद्येचा अंनिसकडून भंडाफोड

By admin | Updated: March 17, 2015 00:08 IST

पानसरेंचे खुनी शोधतो ! : ज्योतिष्याचा दावा

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांचे खुनी लोलकविद्येच्या जोरावर शोधून काढेन, असा सनसनाटी दावा सोमवारी फसवणूकप्रकरणी अटक केल्यानंतर एका भोंदू ज्योतिषाने चक्क पोलिसांसमोरच केला. कथित लोलकविद्येच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकत असल्याचा दावा करणारा आणि ७२ रोगांचे निवारण मंत्राने करीत असल्याची जाहिरात करणारा भोंदू ज्योतिषी सोमवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या रचलेल्या सापळ्यात अडकला. मूल होण्यासाठी मंत्र-तंत्राचे तोडगे सुचवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शाहूपुरी पोलिसांनी या ज्योतिषास अटक केली. विश्वास भालचंद्र दाते असे नाव असून, तो मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दैवी औषध आणि उपचार जाहिरात प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंडविधानाच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, श्रीनिवास जांभळे हे सर्वजण विविध समस्या घेऊन दातेच्या यादोगोपाळ पेठेतील कार्यालयात जाऊन आले होते. सोमवारी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दातेचा पर्दाफाश करण्याची तयारी केली. पोतदार यांनी मूल होत नसल्याचे दाते याला सांगितले. त्याने पोतदार यांना पत्नीसह बोलावले होते. अडीचशे रुपये दक्षिणाही सांगितली होती. त्यानुसार ‘अंनिस’चे कार्यकर्ते आणि पोलिसांनी चतुराईने योजना आखली.स्थानिक गुन्हे शाखेतील महिला कॉन्स्टेबल मोनाली निकम या पोतदार यांच्यासोबत गेल्या. त्यांची ओळख पोतदार यांच्या पत्नी म्हणून करून दिली. परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव हे पोतदार यांचा ‘मेहुणा’ बनून सोबत गेले. बारा वर्षे झाली तरी मूल होत नाही, दारूचे व्यसन आहे, असेही पोतदार यांनी सांगितले. यावर दातेने अजब ‘उपाय’ सांगितले; तसेच आत्मा पोतदार यांच्या घरी आणि मूळ गावीही ‘जाऊन आल्याचे’ सांगितले. नंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी मूळ रूप उघड केले आणि दातेला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)दाते यांचा अजब दावापोलीस ठाण्यात दातेने अजब दावा केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात प्लँचेट झाल्याचे कथित प्रकरण गाजले असतानाच, ‘दाभोलकरांसह गोविंद पानसरे यांचे खुनीही मी लोलकविद्येच्या मदतीने शोधून काढून दाखवेन,’ असे तो पोलिसांसमोरच म्हणाल्याने पोलीस चाटच पडले.