शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 11:09 IST

शहरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून काल, मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कोल्हापूर : शहरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून काल, मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. तातडीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तीस नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.दोन दिवसांपूर्वी नागाळापार्क येथील एक व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेली त्यांची २७ वर्षीय मुलीचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल मंगळवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. ही तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे या तरुणीसह तिच्या वडिलांनीही कोविडचे दोन डोस घेतले होते.

मंगळवारी साईक्स एक्स्टेशन व सुर्वेनगर येथील दोन व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाले. साईक्स एक्स्टेशनमधील ४७ वर्षीय पुरुष व्यक्ती दि. २१ डिसेंबर रोजी जर्मनीहून निघून दुबई, नवी दिल्ली, पुणे, सातारा असा प्रवास करुन कोल्हापुरात आली आहे.

भारतात परतत असताना जर्मनी येथे तर भारतात आल्यानंतर नवी दिल्ली येथे दि. २२ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले होते. या व्यक्तीने दोन डोस घेतले होते; परंतु कोल्हापुरात आल्यानंतर २५ डिसेंबरला त्यांना सौम्य ताप आला.

त्यामुळे २७ डिसेंबर रोजी पुन्हा चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या ३७ व्यक्तींची आरटीपीसीआर करण्यात आली तेव्हा त्यांच्या पत्नीही कोरोना बाधित असल्याचे दिसून आले.

सुर्वेनगरात ओमायक्रॉन

सुर्वे नगरातील ५७ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती २३ डिसेंबर रोजी अमेरिकेतून मुंबईत आणि तेथून कोल्हापुरात आली आहे. मुंबई विमानतळावर त्यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता; मात्र कोल्हापुरात खासगी रुग्णालयात केलेल्या चाचणीनंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.

प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर 

शहरात तीन नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळून आल्याचे कळताच महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने तीन रुग्ण रहात असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करुन त्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन