जयसिंगपूर : बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिसांनी आणखी आरोपीस बुधवारी अटक केली. पंकज सुधीर आंबी (उदगाव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव असून या गुन्ह्यात आरोपीची संख्या आता चार झाली आहे. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांच्या रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने पर्दाफाश करून ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणी साहिल मुल्लाणी (रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार तोवार (मूळगाव- इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ) व रमेश पाटील (रा. जुना चंदूर रोड, बरगे मळा, इचलकरंजी) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस तपासात उदगावच्या आंबीचे नाव पुढे आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Fake Currency Case: Another Arrest, Accused Count Reaches Four
Web Summary : Police arrested Pankaj Ambi in the Kolhapur fake currency racket. He's the fourth arrest linked to the 68,400 rupee seizure. Ambi is in police custody until November 7th. The investigation continues to unfold.

Web Title : कोल्हापुर नकली नोट मामला: एक और गिरफ़्तारी, आरोपियों की संख्या हुई चार
Web Summary : कोल्हापुर नकली नोट मामले में पुलिस ने पंकज आंबी को गिरफ्तार किया। वह 68,400 रुपये की जब्ती से जुड़ा चौथा आरोपी है। आंबी 7 नवंबर तक पुलिस हिरासत में है। जांच जारी है।
Web Summary : कोल्हापुर नकली नोट मामले में पुलिस ने पंकज आंबी को गिरफ्तार किया। वह 68,400 रुपये की जब्ती से जुड़ा चौथा आरोपी है। आंबी 7 नवंबर तक पुलिस हिरासत में है। जांच जारी है।