शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी एक हजार डॉक्टर्स भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:35 IST

CoronaVirus Hospital Kolhapur : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ठळक मुद्देराज्यात आणखी एक हजार डॉक्टर्स भरणारराजेश टोपे यांची माहिती : दोन महिन्यात करणार कार्यवाही

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.जिल्हा दौऱ्यावर आलेल्या टोपे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गट क आणि ड च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून ही प्रक्रिया ही दोन महिन्यात संपवण्यात येईल. आशा वर्कर्स ना महिलाना १५०० रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या १००० रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.तिसऱ्या लाटे आधी आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये १२२२ कोटी रूपयांची मंजुरी घेण्यात आली असून निधीची अडचण भासणार नाही.उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्नकोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना लस दिली आहे. कोल्हापूरचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राने राबवण्याची गरज यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केली.अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नतिसरी लाट आली तरी कामगारांचे लसीकरण करून, त्यांना कारखान्याच्या आवारातच निवासाची व्यवस्था करून उद्योग आणि कारखाने सुरू रहावेत यासाठी नियोजन सुरू आहे. आधीच थांबलेले अर्थचक्र पुन्हा थांबू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत असे टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर