शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:07 IST

यावर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने बुधवारी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी दुपारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. यावर्षी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर पहिल्या फेरीत ८५५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश

कोल्हापूर :  यावर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने बुधवारी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी दुपारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली.यावर्षी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.शहरातील अकरावी प्रवेशाची क्षमता १४६५६ इतकी असून, त्यासाठी ११६७९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. समितीकडून या अर्जांची छाननी करून निवड यादी तयार करण्यात आली. निवड यादीनुसार पहिल्या फेरीत एकूण ८५५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या निवड यादीसह प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेची माहिती केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या व प्रवेशाची क्षमता याचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पसंतीक्रम, आरक्षणानुसार निवड यादी तयार केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही. त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी गुरुवार ते मंगळवार (दि. १६) दरम्यान, मूळ कागदपत्रांसह त्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करावयाचा आहे. बुधवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील.

या पत्रकार परिषदेस केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष प्रा. अशोक देशमुख, सदस्य प्रा. टी. के. सरगर, रवी पोर्लेकर, एस. एस. चव्हाण, आर. व्ही. कोळेकर, एन. एच. पिसाळ, जी. व्ही. खाडे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर