शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २०१ गावांत दुष्काळ जाहीरजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दुष्काळग्रस्त गावांना सवलती लागू

कोल्हापूर : जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५0 मि.मी.पेक्षा कमी झाले आहे, अशा कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १९ महसुली मंडळांमधील २0१ गावांमध्ये दुष्काळ घोषित करून, सवलती लागू करण्यास शासनमान्यता दिली आहे.जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या २०१ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील गावेदुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये हातकणंगले तालुक्यातील ६२ गावे, शिरोळ तालुक्यातील १६, पन्हाळा तालुक्यातील ३५, करवीर तालुक्यातील ३४, गडहिंग्लज तालुक्यातील ३५ आणि भुदरगड तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर