शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

घोषणा झाली, पण... भिरभरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:19 IST

बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत

-उदय कुलकर्णी --बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा केली. घोषणा ऐकून अवघा महाराष्ट थक्क झाला.खरं तर शौचालये बांधण्यासाठी अनुदान ही काही नवी योजना नव्हे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तशी अनुदाने ग्रामीण भागात शौचालये बांधणाऱ्यांना पूर्वीही दिली जात होती. अशा काही कामांची पाहणी करण्यासाठी मी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत फिरत होतो. अनेक खेड्यांत घरांजवळ नवी बांधकामे दिसली. कुतूहलानं चौकशी केली. ती शासकीय अनुदानातून उभारलेली शौचालये असल्याचं कळलं. काही ठिकाणी त्या शौचालयांमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या, तर काही ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून पी.सी.ओ. सुरू केलेला होता. विचारलं, ‘शेळ्या इथं, पी.सी.ओ. इथं, मग शौचाला कुठं जाता?’ - तर उत्तर मिळालं ‘ते काय पूर्वीपासून जसं चालू आहे तसं चालू आहे’. आता हागणदारीमुक्तीच्या नावावर नव्याने हजारो कोटी रुपये शौचालयावर खर्च झाले आहेत. दुसºया टप्प्यात म्हणे शौचालयांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. - प्रश्न आहे की, शौचालयांची उभारणी व जनजागृती या दोन्ही गोष्टी एकावेळी करता आल्या नसत्या का? - दुसरी बाब,अजूनही गावागावांत, शहराशहरांत अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, त्याबाबतची जाग कधी येणार आहे?विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट. सीताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन हे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजचे स्कॉलर. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पटवर्धनांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली; पण गांधींनी त्यांना आधी खेडेगावांत जाऊन मानवी विष्ठा आणि कचरा गोळा करीत ग्रामस्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याविषयी सुचवलं. उच्चशिक्षित पटवर्धनांनी कणकवली गाठलं. रोज कावडीतून गावातला मैला गोळा करायला सुरुवात केली. लोकांनी सुरुवातीला वेड्यात काढलं; पण एकत्र केलेल्या मैल्यातून त्यांनी सोनखत बनवलं आणि शेती फुलवून दाखवली. मानवी विष्ठा वाहून नेणाºयांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी चराचे संडास, गोपुरी संडास असे अनेक प्रकारचे संडास बनवले. कणकवलीत गोपुरी आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संडासचे म्युझियमही उभारले. ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त आणि मानवी विष्ठेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण काय केले याची पटवर्धन यांनी पत्रकार बैठक घेऊन जाहिरात केल्याचे मात्र आठवत नाही. सध्या मात्र किती हजार कोटी खर्च याच्या जाहिरातीचा जमाना आहे. ग्रामस्वच्छता करायची म्हणजे इस्त्रीचे कपडे घालून नवा कोरा लांब दांड्याचा झाडू घेऊन तोंडाला मास्क घालून, कपड्यावर अ‍ॅप्रन बांधून व हातात ग्लोव्हज घालून छायाचित्रे काढायची म्हणजे निवडणुकीत त्याचा उपयोग करता येतो. ‘कोकण’ गांधींचा आदर्श कोण घेणार? त्यांचा आदर्श घेऊन निवडणुका थोड्याच जिंकता येणार आहेत?मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली हे खरे; पण याच महाराष्टÑात शहराशहरांमध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्याचं काय? ना कचºयाच्या उठावाची योग्य व्यवस्था आहे, ना कचºयाच्या योग्य विल्हेवाटीची ! कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद अशा सगळ्याच शहरांच्या परिसरात कचºयांचे डोंगर आणि त्यानं पसरणारं अनारोग्य पाहायला मिळायला लागलंय. अधूनमधून हे कचºयाचे ढीग पेटवून दिले जातात आणि प्रदूषणात भर घातली जाते. मध्यमवर्गीय नागरिक शहर स्वच्छतेबाबत अतिजागरूक म्हणून ते ‘गार्बेज वॉक’ काढून आपला संताप व्यक्त करतात. बलात्कार झाला की मेणबत्त्या घेऊन फेरी काढायची. विचारवंताची हत्या झाली की, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढायचा आणि कचरा फार झाला असं वाटलं तर ‘गार्बेज वॉक’ काढायचा. या पलीकडं जाऊन नागरिकांमध्ये कृतिशिलता यावी यासाठी आपण काय करणार आहोत? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणास माहिती आहे का? २०१७ या वर्षात दर दिवशी सर्वाधिक कचरा निर्माण करणाºया राज्यांमध्ये देशात महाराष्टÑाचा पहिला क्रमांक होता. देशामध्ये दररोज दीड लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचºयापासून देशाला आणि महाराष्टÑाला मुक्ती कशी मिळेल?( -  लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत   kollokmatpratisad@gmail.com)