शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानतर्फे कुंंकुमार्चन सोहळा उत्साहात, अंबाबाई दिनदर्शिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:22 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ठळक मुद्देदेवस्थानतर्फे कुंंकुमार्चन सोहळा उत्साहातअंबाबाई दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षी श्री अंबाबाईची छायाचित्रे असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. आगामी २०२० सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंदिर परिसरात झाले.

यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते. यावेळी स्वॅप मशीनचेही उद्घाटन झाले. या मशीनमुळे परस्थ भाविकांना अंबाबाई मंदिरासाठी देणगी देणे अधिक सोईस्कर झाले आहे.यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांनी पुढील काही दिवसांत पॅथॉलॉजी लॅब व डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे कमी खर्चात आजाराचे निदान करता येणार आहे, तसेच समितीतर्फे अ‍ॅम्ब्युलन्सची सोय असणार आहे.दिनदर्शिकेच्या प्रकाशनानंतर समितीच्या कार्यालयासमोर कुंकुमार्चन सोहळा घेण्यात आला. यात ७00 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. या सगळ्या महिलांना समितीतर्फे दिनदर्शिका देण्यात आली.

पुजारी सुदाम सांगळे व योगेश व्यवहारे यांनी पौरोहित्य केले. नवीन वर्षात दर शुक्रवारी कुंकुमार्चन विधी घेण्यात येणार असून, एकावेळी ५० महिलांना यात सहभाग घेता येईल.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर