शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन,शिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:45 IST

शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला.

ठळक मुद्देकैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिनशिवशंभोच्या जयघोषात पालखी सोहळा

कोल्हापूर : शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन् फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांजपथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला.मंगळवारपेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी मुख्य पालखी सोहळा होता. सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव, अध्यक्ष बबेराव जाधव, सुनीलकुमार सरनाईक, अशोक मेस्त्री, विलास गौड, शिवाजी जाधव, गणेश भोसले, महेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी पहाटे श्रींस अभिषेक व आरती करण्यात आली.त्रिशूळाच्या आकारातील चांदीच्या पालखीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरापासून पालखी सोहळ््याला सुरुवात झाली. पालखीच्या सुरुवातीला राशिवडे येथील धनगरी ढोल पथकाचे तालबद्ध वादन आणि नृत्याने सायंकाळच्या या सोहळ््यात उत्साहाचे रंग भरले. झांज पथकाचा नाद पुढे वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्यावतीने मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी भागातील लहान मुले व पुरुष पांढरा झब्बा व भगव्या रंगाचा फेटा परिधान केला होता. तर सजलेल्या महिलांनीही पालखी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला. मार्गात नागरिकांकडून पालखीचे पूजन व स्वागत केले जात होते. पाटाकडील तालीम मंडळ, देवणे गल्ली, खासबाग चौक, भोसले गल्ली मार्गे रात्री पालखी पुन्हा मंदिरात आली. वर्धापनदिनानिमित्त मंदिराला व संपूर्ण परिसरालाच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री महाप्रसादाने या आठ दिवसीय सोहळ््याची सांगता झाली.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर