शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याजच देणार : शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:15 AM

कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना

ठळक मुद्देनव्या तीन कर्जयोजनांचे निकष जाहीरलाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना केली असून, प्रत्येकी किमान १० लाख रुपये कर्ज देणाºया तीन नव्या योजना जाहीर केल्या आहेत. शासनाच्या वतीने मंगळवारी त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला.

पूर्वीची बीज भांडवल योजनाच रद्द करण्यात आली असून, नव्या तिन्ही योजनांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच घ्यावे लागणार आहे. महामंडळ फक्त त्याचे व्याज दरमहा लाभार्थ्यांच्या नावांवर भरणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप कर्ज नव्हे, तर व्याज योजना असे राहणार आहे.

या महामंडळाच्या योजनांचा मराठा समाजातील तरुणांना काहीच लाभ होत नसल्याच्या तक्रारी राज्यभर होत्या.‘लोकमत’ने त्यासंबंधीची वृत्तमालिकाही प्रसिद्ध केली. त्यानंतर शासनाने कर्ज योजनेतील उत्पन्नाची अट सहा लाखांपर्यंत केली; परंतु तरीही कर्जासाठी तरुण या महामंडळाकडे फिरकले नाहीत; म्हणून शासनाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमून कर्जयोजनांचा फेरविचार केला व नव्या तीन योजना जाहीर केल्या आहेत.

लाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,’ अशी होती; कारण राष्ट्रीयीकृत बँका बेरोजगार तरुणांना दारात उभ्या करून घेत नाहीत. अन्य समाजासाठी महामंडळे स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात..मग याच महामंडळाला तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांच्या गळ्यात का बांधता? अशी विचारणा होत होती; परंतु शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. यापूर्वीही गट कर्ज योजनेस १० लाख रुपये मिळत होते; परंतु त्याचा लाभ घेण्यास फारसे कोणी पुढे येत नव्हते. आताही योजनेचे निकष व तिचे स्वरूप पाहता तिला कितपत प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकताच जास्त आहे.नव्या योजना अशावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : लाभार्थ्यास १० लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज हप्ते नियमित भरल्यास महामंडळ देणार.(व्याजदर १२ टक्के मर्यादा)गट कर्ज व्याज परतावा योजना : १० ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार. त्यावरील व्याज ५ वर्षे देणार. कर्ज १५ लाखांपर्यंत असेल तर व्याजाची रक्कम दरमहा देणारगट प्रकल्प कर्ज : शेतकरी उत्पादक गटांना १० लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार.