शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

‘अंनिस’चा रक्तदानातून आत्मक्लेष

By admin | Updated: July 20, 2014 23:17 IST

विवेकवाहिनीची साथ : दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा निषेध

सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ११ महिने पूर्ण झाले तरीही खुनाच्या तपासात प्रगती नाही. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या भावनेने त्यांचे कार्यकर्ते जोमाने चळवळ पुढे नेत आहेत. आजपर्यंत दर महिन्याच्या २० तारखेला समितीचे कार्यकर्ते अहिंसक मार्गाने हत्येचा निषेध करत आले आहेत. रविवार, दि. २० जुलै रोजी सामाजिक भावनेतून कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील माउली ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पडले. समितीचे कार्यकर्ते, विवेकवाहिनीचे कार्यकर्ते तसेच सातारा परिसरातील नागरिकांनी यावेळी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली वाहिली.‘डॉ. दाभोलकर यांनी दि. २० आॅगस्ट २०१३ रोजी समाजासाठी रक्त सांडले. त्यांच्या मारेकऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला रक्तदान करून विधायक उत्तर देत आहेत. मारेकऱ्यांचा शोध लावण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आले नाही. याची खंत कार्यकर्त्यांना असून, याचाच आत्मक्लेष म्हणून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत आहेत,’ असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.आतापर्यंत पुणे, लातूर, धुळे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध शाखांनी २० तारखेला रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यापुढेही राज्यभरातील कार्यकर्ते अशी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत.यावेळी डॉ. मधुकर पारंगे, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, विजय मांडके, उदय चव्हाण, उद्धव शिंगटे, हौसेराव धुमाळ, वैशाली जांभळे, पूजा जाधव, शिवप्रसाद मांगले, प्रा. भागवत शिंदे, प्रा. आर. वाय. जाधव, भगवान रणदिवे, दशरथ रंधवे, वल्लभ वैद्य यांच्यासह अंनिस आणि विवेकवाहिचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)