शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Kolhapur: अनिकेत, श्रेयसची राज्य क्रिकेट संघात वर्णी

By सचिन भोसले | Updated: October 25, 2023 18:22 IST

कोल्हापूर : केडीसीए'चा खेळाडू अनिकेत नलवडे व श्रेयस चव्हाण यांची सुरत येथे २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ...

कोल्हापूर : केडीसीए'चा खेळाडू अनिकेत नलवडे व श्रेयस चव्हाण यांची सुरत येथे २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या तेवीस वर्षाखालील राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली.एकदिवशीय साखळी पध्दतीने होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह  पंजाब, हिमाचल प्रदेश, पाॅडेचरी, केरळ, कर्नाटक, नागालॅड या संघात सामने होणार आहेत. अनिकेतने यापुर्वी विविध वयोगटात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने विजय मर्चंट स्पर्धेत चार सामन्यात १६० धावा व ९ बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. सन २०१८-१९ या हंगामात त्याने कुचबिहार ट्राॅफी स्पर्धेत सहा सामन्यांत ४०० धावा व १२ बळी घेतले आहेत. सन २०२१-२२ या हंगामात २५ वर्षाखालील कर्नल सी.के.नायडू स्पर्धेत महाराष्ट्राचा उपकर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत त्याने २०२२-२३ या हंगामात ६२७ धावांचा पाऊस व नऊ बळी मिळवले आहेत.  श्रेयसनेही यापुर्वी २०२१-२२ या हंगामात १९ वर्षाखालील गटात कोल्हापूरकडून खेळताना ५ सामन्यांत तब्बल ४६ बळी घेतले आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याची विनू मंकड एकदिवशीय स्पर्धेसाठी राज्य संघात वर्णी लागली होती. या दोघांची एमसीएच्या प्रिमियर लीगसाठी संघात निवड झाली होती. सध्या दोघेही गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सराव करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर