शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांवर अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:38 IST

कोरोना महामारीच्या संसर्गात खासगी रुग्णालयात डॉक्टर हात न लावताच दुरूनच औषधांचा सल्ला देऊन रुग्णापासून पिच्छा सोडवितात. अशा परिस्थितीतही कोल्हापुरातील सीपीआरच्या कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांवर अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी प्रयोग यशस्वी केला.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये धाडसी प्रयोग; पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटनाशरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याने एकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या संसर्गात खासगी रुग्णालयात डॉक्टर हात न लावताच दुरूनच औषधांचा सल्ला देऊन रुग्णापासून पिच्छा सोडवितात. अशा परिस्थितीतही कोल्हापुरातील सीपीआरच्या कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्णांवर अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी प्रयोग यशस्वी केला; पण पुरुष रुग्णाला ऑक्सिजन कमी पडल्याने रविवारी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली; तर दुसऱ्या महिला रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रियेची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना.जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण धास्तीने हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावत आहेत. सर्वत्र रुग्णांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. अशा स्थितीतही सीपीआर रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या पथकाने शस्त्रक्रियेचे धाडस दाखविले.एक ४८ वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेताना त्यांना शनिवारी (दि. २९) दुपारी अटॅक आला. डॉ. बाफना यांनी तातडीने त्याच्यावर तातडीने अ‍ॅजिओप्लास्टीही यशस्वी केली. रात्री त्याची प्रकृती सुस्थितीत होती, पण हा क्षणिक आनंद फार काळ टिकला नाही. रविवारी सकाळी शरीराने ऑक्सिजन कमी प्रमाणात घेतल्याने त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.दरम्यान, आणखी एका ५३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवरही शनिवारी रात्रीच सीपीआरमध्ये अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. रोगनिदानमध्ये आढळलेल्या तीन ब्लॉकेजपैकी एक तातडीने अ‍ॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून काढून तेथे स्टेंट बसवली. आज, सोमवारी पुन्हा दोन्हीही ब्लॉकेज काढून स्टेंट बसविणार असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयात त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरच त्यांच्यावर तातडीची शस्त्रकिया करून त्यांना जीवदान मिळाले. त्या महिलेची प्रकृती सुस्थितीत असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले.पीपीई किट घालून शस्त्रक्रियाकार्डिओलॉजिक्ट विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांना कार्डिओलॉजिस्ट डॉ. वरुण देवकाते, सिस्टर मेट्रन शामल पुजारी यांच्यासह सिस्टर पल्लवी जाधव, देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे यांचे सहकार्य लाभले. या पथकाने अंगावर पीपीई किट परिधान करून या दोन्हीही शस्त्रक्रिया केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर