शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Kolhapur: अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर जाणार

By पोपट केशव पवार | Updated: November 18, 2023 16:21 IST

कोल्हापूर : ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, ‘कांदा म्हटला बटाट्याला, लाज ...

कोल्हापूर : ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, ‘कांदा म्हटला बटाट्याला, लाज नाही सरकारला’ अशा घोषणा देत कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची नोटीस जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उममुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे देण्यात आली. महावीर गार्डनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्या, मदतनिसांना २० हजार रुपये मानधन सुरू करा, महागाई निर्देशांकाला जोडून सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा, विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकासमंत्र्यांनी मान्य केला आहे. तो नाेव्हेंबरअखेरपर्यंत तयार करून हिवाळी अधिवेशनात मंजूर करा, महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करा, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६, तर कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या; पण या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना भरघोस व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ का? सरकार नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. त्यामुळेच ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मोर्चात दीड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे आप्पा पाटील, जयश्री पाटील, सुनंदा कुराडे, सुरेखा कोरे, मंगल गायकवाड, शोभा भंडारे, शमा पठाण, सरिता कंदले, अनिता माने, अर्चना पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मासिक बैठकीवर बहिष्कारसंपाच्या आधी नोव्हेंबरमधील मासिक प्रगती अहवाल, मासिक बैठक व इतर कोणतीही माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे युनियने सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर