येथील राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. आनंदऋषीजी महाराजसाब यांच्या जन्मजयंतीनिमित्त आयोजित आनंद गौरव पुरस्कार २०२१ वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे होते.
लिखमीचंद बंब (जीवन गौरव), पद्मजा चंगेडिया (धार्मिक), जीवनराज पूनमिया (उद्योग), प्रीतम बोरा (सामाजिक), हेमा चोपडा (कला), महेश गांधी (विशेष गौरव पुरस्कार), चिराग बाबेल (विशेष गौरव पुरस्कार) यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया यांनी स्वागत व अभिजित पटवा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमास विलास गांधी, अशोक गांधी, संजय सुरपुरे, नूतन मुथा, प्रेमराज बंब, सुमतीलाल शहा, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनाली मुनोत यांनी केले. हर्षल बोरा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित पटवा, रवींद्र भंडारी, मनोज मुनोत, संजय गुगळे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी
इचलकरंजीत राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. आनंदऋषीजी महाराजसाब यांच्या जन्मजयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींना आनंद गौरव पुरस्काराने सन्मानित केले.