शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 15:27 IST

स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ? 

चंदगड : अनेकवेळा मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता व इतर सुविधांअभावी चंदगड तालुक्यातील अनेक धनगरवाडे उपेक्षित आहेत. याचा फटका अर्धांगवायूचा झटका आलेल्या बुझवडे धनगरवाड्यावरील पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धाला शनिवारी रात्री बसला. त्यामुळे स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ? अशा संतप्त भावना धनगरवाड्यावरील कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहेत.बुझवडे (कुरणी) धनगरवाड्यावरील नवलू बिरू कस्तुरे (वय ७५) यांना शनिवारी रात्री अर्धांगवायूचा झटका आला; पण धो-धो पाऊस, काट्याकुट्टाची वाट त्यात जंगली श्वापदांचा धोका यामुळे त्या वृद्धाला त्याच्या कुटुंबीयांसह इतरांना उपचाराविना ठेवावे लागले. शेवटी रविवारी सकाळी प्लास्टिकच्या डालग्यात घालून चारजणांच्या मदतीने नवलू यांना मुख्य रस्त्यावर आणून त्यांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले.यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबू वरक, बयाजी वरक, रामू कोकरे, सखोबा डोईफोडे, संजय कस्तुरे, बीरू कस्तुरे, यमाजी कस्तुरे, विठोबा कस्तुरे, धुलू कस्तुरे, बिरू कस्तुरे, पांडू कस्तुरे यांनी नवलू यांना डालग्यात घालून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रशासन आजही सुस्तचस्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनंतर अशा दुर्दैवी घटना धनगरवाड्यावरील जनतेच्या वाट्याला कायम आहेत. नेते मात्र निवडणूक आली की आश्वासन देऊन मते घेतात. अन् नंतर सोयीस्करपणे विसरून जातात. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील रस्ते करण्याबाबत अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु नेते आणि प्रशासन मात्र आजही सुस्तच असल्याची खंत यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhospitalहॉस्पिटल