शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Kolhapur: सहा वर्षे नियमबाह्य वेतनवाढीचा लाभ, हातकणंगले ‘कृषी’तील लिपिकाचा प्रताप 

By पोपट केशव पवार | Updated: February 13, 2025 18:18 IST

वसुलीसाठी ‘कृषी’ची दिरंगाई

पोपट पवारकोल्हापूर : हातकणंगले तालुका कृषी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तब्बल सहा वर्षे नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूर्यकांत लक्ष्मण माने असे या लिपिक कर्मचाऱ्याचे नाव असून ते हातकणंगले तालुका कृषी कार्यालयात लिपिक आहेत. शिपाई ते लिपिक असा त्यांचा प्रवास झाला असून त्यांनी २०१३ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचे आढळून आले आहे. वेतनवाढीसाठी विभागाची अंतर्गत सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, माने ही परीक्षा उत्तीर्णच झाले नाहीत. परंतु, तरीही त्यांनी तब्बल सहा वर्षे वेतनवाढ घेतल्याने त्यांना नेमका कुणाचा वरदहस्त होता, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे माने यांची ही नियमबाह्य वेतनवाढ २०१९ ला कृषी विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ती थांबवण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत याची वसुली केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऑडिटमध्ये कळले कसे नाहीकृषी कार्यालयांचे प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण होते. यात खुट्ट वाजले तरी लेखापरीक्षकांना ते कळते. मात्र, एखादा कर्मचारी तब्बल सहा-सहा वर्षे सरकारच्या लाखो रुपयांच्या पैशांवर डल्ला मारत असताना ही चूक कशी दिसली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.‘कृषी’चा आंधळा कारभारमाने यांचा हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकारात उघडकीस आणला. मात्र, तरीही माने यांच्यावर कारवाई करण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यांना नियमबाह्य पद्धतीने वेतनवाढ देताना तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली नाही का, की डोळे बंद करून वेतनवाढ दिली, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

डायऱ्याच नाहीत तरी डिझेलची बिले मंजूरहातकणंगले कृषी कार्यालयातील पाच वर्षांच्या डायऱ्याच मंजूर नाहीत. मात्र, तरीही कृषीप्रमुखांनी डिझेलची बिले मंजूर करून घेतल्याची कुजबुज सुरू आहे. कृषीचे प्रमुख कुठे व किती कि.मी. वाहनांनी फिरले याच्या नोंदीच नसताना त्यांची लाखो रुपयांची बिले कशी काय मंजूर झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियमबाह्य वेतनवाढ घेतलेल्या सूर्यकांत माने यांची चौकशी करण्याच्या सूचना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. -जालिंदर पांगरे, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रhatkanangle-pcहातकणंगले