शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- चवताळलेल्या हत्तीने कार फोडली, ३०० फूट फरफटत शेतात फेकली; नागरिकांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:16 IST

परिसरातील भात शेतीचे हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरूच

पेरणोली : देऊळवाडी (ता. आजरा) येथे हत्तीने हणमंत सावंत यांनी घरासमोर लावलेली कार कुटुंबाच्या डोळ्यासमोर फरफटत नेत शेजारील भात शेतीत फेकून देऊन तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.गेल्या आठ दिवसांपासून हत्ती चित्री प्रकल्पाशेजारील गावात धुमाकूळ घालत आहे. देऊळवाडी, खानापूर, इटे, रायवाडा गावातील वसाहतीमधून हत्ती फेरफटका मारत आहे. बुधवारी रात्री देऊळवाडी गावात हत्ती फेरफटका मारत असताना हणमंत सावंत यांनी दारात लावलेली अल्टो कार सोंडीतून उचलली. रात्री बाराच्या दरम्यान बाहेर आवाज आल्याने सावंत यांनी खिडकीतून पाहिले असता हत्ती कारला फरफटत समोरील उसाकडे नेत असल्याचे दिसले. उसातून शेजारी ३०० फूट असणाऱ्या भात शेतात कार नेऊन फेकली. यावेळी हताशपणे पाहण्याशिवाय सावंत यांच्याकडे पर्याय राहिला नाही. हत्ती आता थेट गावातच येत असल्याने शाळकरी मुले व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.खानापूर तलावात व चित्री प्रकल्पात भरपूर पाणी असल्याने प्रकल्पातील पाण्यात डुबून परिसरातील भात शेतीचे हत्तीकडून नुकसानीचे सत्र सुरू आहे. भात नुकसानीसोबत आता हत्ती कार व यंत्राचेही नुकसान करत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.

दुसरी घटना३ वर्षांपूर्वी इटे येथील शिक्षक पांडुरंग सुकवे यांची कार हत्तीने फोडली होती. त्यानंतर त्याच गावाशेजारी देऊळवाडीत सावंत यांची कार फेकली आहे. ही एकाच परिसरातील दुसरी घटना घडली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर