शिरोली : शिरोली सांगली फाटा येथील एका मार्बल दुकानाच्या पत्र्याच्या शेडची साफसफाई करताना छताचा पत्रा तुटून छतावरून खाली पडल्याने कामगार अशोक चारू पाटील (वय ७०, रा. हालोंडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.अधिक माहिती अशी, पाटील हे घरची परिस्थिती बेताची असल्याने वृद्धापकाळातही सांगली फाटा रामदेवबाबा मंदिर येथील एका मार्बल दुकानात कामाला होते. सोमवारी दुपारी ते दुकानाच्या छतावर साचलेला कचरा काढण्यासाठी चढले होते. यावेळी छताचा पत्रा तुटून पाटील छतावरून खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.सोमवारी रात्री बाराच्या सुमारास शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Web Summary : Ashok Patil, 70, died in Shiroli after falling through a roof while cleaning a marble shop's shed. He was cleaning debris when the sheet broke. Patil is survived by his wife, son, and grandchildren.
Web Summary : शिरोली में मार्बल की दुकान की सफाई करते समय छत से गिरने से अशोक पाटिल (70) की मौत हो गई। मलबा साफ करते समय चादर टूट गई। पाटिल के परिवार में पत्नी, बेटा और पोते-पोतियां हैं।