शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आराखडे, सादरीकरण झाले पण उड्डाणपूल हवेतच राहिले, कोल्हापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे-थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:16 IST

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण

भारत चव्हाण

कोल्हापूर : वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सन २०१७ मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या गर्दीच्या भागात पाच उड्डाणपूल उभारण्याचे आराखडे तयार केले, परंतु गेल्या पाच वर्षांत या आराखड्यावर कसलीच चर्चा झाली नाही. ज्यांच्या सूचनेवरून उड्डाणपुलाचे आराखडे झाले, त्या चंद्रकांत पाटील यांच्याकडून नंतर दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडीचेही दुर्लक्ष झाले. त्यामुळे उड्डाणपूल हवेतच राहिले.

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, खासगीकरणातून विकासकामे करण्यास होणार विरोध लक्षात घेऊन, युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी पाच उड्डाणपूल उभारण्यासाठी आर्किटेक्ट संदीप गुरव यांना आराखडे बनविण्यास सांगितले होते. त्यांनी दिवसरात्र काम करून ते आराखडे तयार केले. त्याचे एकदा सादरीकरण झाले, पण नंतर सर्व आराखडे कपाटबंद राहिले आणि उड्डाणपूल हवेतच विरले.

शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची वाहने, तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून येणारी वाहने याचा अतिरिक्त ताण प्रचंड आहे. शहराभोवतीचा रिंग रोडही झालेले नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सांगली, तसेच उत्तर कर्नाटकातून येणारी सर्व वाहने कोल्हापूर शहरातूनच खाली कोकणात जातात. त्याचा परिणाम म्हणून शहरात कोणत्याही भागात गेलात, तरी लहान रस्ते, वाढलेली अतिक्रमणे, वाहतुकीची कोंडी, पार्किंग यांसारखे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत.

भविष्यकाळाचा विचार करता, पुढील काही वर्षांत आणखी वाहनांची संख्या वाढून वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे. म्हणूनच आहे त्याच रस्त्यांचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यायचा असेल, तर उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणताही विकास करण्याआधी वाहतुकीच्या समस्येला सर्वाधिक प्राधान्य देण्यावर विचार आणि निधीची तरतूद करावी लागणार आहे.पाचही उड्डाणपूल एकदम होणार नसले, तरी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी एखादा तरी उड्डाणपूल, रिंग रोड करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील असोत की, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असोत, दोघेही निधी आणण्यात तरबेज आहेत, पण त्यांनी एकदा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

असे होते उड्डाणपुलाचे आराखडे 

- दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक - लांबी १५०, रुंदी ८ मीटर

- दाभोळकर चौक ते दसरा चौक - लांबी - लांबी २०००, रुंदी ८ मीटर

- जोतिबा हॉटेल ते कावळा नाका चौक - लांबी २०००, रुंदी आठ मीटर

- टाउन हॉल ते जयंती नाला - लांबी ८००, रुंदी, ८ मीटर

- पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर - लांबी २,००० मीटर, रुंदी आठ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी