शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

‘अमृत योजने’ला वारणाकाठचा विरोधच

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन : लोकप्रतिनिधींनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्याची गरज

भालचंद्र नांद्रेकर -- दानोळी शिरोळ तालुक्याच्या उत्तर भागाला व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांना, तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना मुख्य जलवाहिनी म्हणून वारणा नदीची ओळख आहे़ दानोळी (ता़ शिरोळ) येथील वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे़ मात्र, अमृत योजनेच्या विरोधासाठी दोनवेळा गावे बंद करून शासनाचा निषेध नोंदवला आहे़ अशा परिस्थितीत या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली असली तरी वारणाकाठावरील नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे़ गेल्या चार महिन्यांपूर्वी दानोळी येथे अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समितीची स्थापना केली आहे़ यावेळी प्रथम दानोळी गाव बंद ठेवून शासनाचा निषेध केला होता़ तरीही शासनाने दखल न घेतल्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील व सांगली जिल्ह्यातील गावे एकजुटीने बंद ठेवून दुसऱ्यांदा शासनाला जाग आणली होती़ यातून कोणताही तोडगा यावर निघाला नसताना अमृत योजनेला मान्यता मिळाली आहे़ वारणाकाठावरील शेतकरी व नव्याने समाविष्ट झालेले धरणग्रस्त शेतकरी वारणेच्या पाण्यावर आपले जीवन जगत आहेत़ यामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मिटविणे ही कायदेशीर जबाबदारी आहे़ येथील शेतकरी व धरणग्रस्तांशिवाय इतर कोणालाही वारणेचे पाणी दिले जाणार नाही, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ़ भारत पाटणकर यांनी व्यक्त केले होते़ इचलकरंजीला ७१ कोटींची अमृत योजना मंजूर झाली आहे़ तरी याला वारणा काठावरून विरोध होत आहे़ सध्या इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी असून, या नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ बस्तवाड येथून कृष्णा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होतो़ त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नागरिकांना विश्वासात घेऊन योजना पूर्ववत करण्याची गरज आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या अमृत योजनेला अंतिम टप्प्यातील मंजुरी आणली असली तरी ही योजना वारणाकाठावरील नागरिक मिळून हाणून पाडू. तसेच येत्या आठवड्याभरात वारणा काठावरील सर्व गावांतून अमृत योजनेच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना ठराव देणार असून, या योजनेला आमचा कायम विरोध राहणार आहे़- महादेव धनवडे, वारणा बचाव कृती समिती कार्यकर्ते.