शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजना होऊ देणार नाही : कुरुंदवाडला सर्वपक्षीय बैठकीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:29 IST

कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही.संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे

कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही. संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीची अमृत योजना होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही बळी द्यावे लागले तरी चालेल, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी दिला.येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर आमदार उल्हास पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषण हटाव मोहीमेसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत धनवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाड नगराध्यक्ष जयराम पाटील, जि. प. सदस्य विजय भोजे प्रमुख उपस्थित होते. वारणाप्रश्नी ठोस निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.

धनवडे म्हणाले, शहराला दोन नद्यांच्या योजना असताना वारणेची योजना कशाला पाहिजे, मागणी नसतानाही विकासाच्या नावाखाली ही योजना मंजूर करण्यामागे गौडबंगाल काय? या योजनेने पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असेल तर विकास होऊन काय करावयाचे.

आमदार पाटील म्हणाले, वारणेतून आठ टीएमसी पाणी कृष्णेत येते; हेच पाणी इचलकरंजीला मिळत असल्याने वारणेच्या योजनेची गरजच काय? या नव्या योजनेवर खर्च करण्यापेक्षा तोच निधी पंचगंगा नदी प्रदूषणावर खर्च केल्यास पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. पाणी कमी पडत असेल तर कृष्णेतून आणखी एक योजना करा, मात्र वारणेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही, असे सांगत आमदार पाटील यांनी हाळवणकरांनी जिल्ह्याचा इतिहास मला शिकवू नये. प्रथम त्यांनी भूगोलाचा अभ्यास करावा, असा टोला देत दडपशाही केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी वारणा बचाव व नदी प्रदूषणमुक्तीसाठी शिरोळ तालुक्याबरोबर असल्याचे सांगितले. यावेळी अमृत योजना रद्द होईपर्यंत व पंचगंगा-कृष्णा नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जि. प. सदस्य विजय भोजे, प्रसाद धर्माधिकारी, कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, अमरसिंह पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांची भाषणे झाली. बैठकीस पं. स. सभापती मीनाक्षी कुरडे, बाबासो सावगावे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण, सुरेश कांबळे, आप्पासो चौगुले, दीपक कोळी, धनाजी चुडमुंगे, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले.कुरुंदवाड येथे कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर सर्वपक्षीय बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे भाषण झाले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, महादेव धनवडे, आमदार उल्हास पाटील, दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी