शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

हद्दवाढीसाठी २२ पासून आमरण उपोषण

By admin | Updated: August 15, 2016 00:50 IST

हद्दवाढ कृती समितीचा इशारा : महापालिकेसमोर धरणे; दोन एमआयडीसींसह १८ गावांच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेची मागणी

कोल्हापूर : राज्य शासनाने हद्दवाढीबाबत तातडीने अधिसूचना काढावी, अन्यथा २२ आॅगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने देण्यात आला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १८ गावे आणि दोन एमआयडीसी यांचा हद्दवाढीमध्ये समावेश करावा अन्यथा ४-५ गावांना घेऊन आम्हाला हद्दवाढ नको, असाही इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात दिला. महापौर अश्विनी रामाणे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी हद्दवाढीबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. लोकप्रतिनिधींनी ग्रामीण जनतेची दिशाभूल थांबवावी. महानगरपालिका विकासात्मक कामे करते, शहरासह परिसरातील ग्रामीण भागालाही सुविधा पुरवते. कराची भीती ग्रामीण जनतेने बाळगण्याची गरज नाही, कारण कर हा सात वर्षांनंतर टप्प्या-टप्प्याने लागणार आहे. येत्या दोन-चार दिवसांत मुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुन्हा बैठक घेऊन आश्वासनाप्रमाणे हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. धरणे आंदोलनस्थळी सर्व आंदोलकांनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, त्यावर ‘हद्दवाढ झालीच पाहिजे’ असा मजकूर होता. या बैठकीत, पक्षांच्या नेत्यांनी भाषणात, आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढीसाठी १८ गावे, २ एमआयडीसी आवश्यकच आहेत, पाच-सहा गावांची हद्दवाढ आमच्यावर लादू नका, हद्दवाढीबाबत तातडीने अधिसूचना काढा, अन्यथा २२ आॅगस्टपासून सर्व पक्षांचे कार्यकर्ते आमरण उपोषण करतील. हद्दवाढ ही काळाची गरज आहे, ग्रामीण गावे शहरात आली तर त्यांचे राहणीमान सुधारणार आहे, असे ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले. तिन्हीही आमदारांच्या सुविधा बंद करा ४हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात पुन्हा आमरण उपोषण करणार असून कोणाचेही ऐकणार नाही. ४पालकमंत्री चंद्रकांतदादांनी ‘शब्द’ दिल्याने उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री हे हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत, हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही. ४शहरात राहून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदारांच्या सुविधा बंद कराव्यात. त्याशिवाय त्यांना हद्दवाढीचे महत्त्व समजणार नाही. ४हद्दवाढीनंतर विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळे हद्दवाढ आवश्यकच आहे, असे आमदार क्षीरसागर म्हणाले. संवाद-प्रतिसंवाद हवा हद्दवाढीबाबत ग्रामीणचे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत. यासाठी ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी एका व्यासपीठावर यावे, समोरासमोरच संवाद-प्रतिसंवाद करावा, त्यातून दोन्हीकडील प्रश्न-उत्तरातून समोरासमोर समज-गैरसमज दूर होतील. ग्रामीण आणि शहरी असा संघर्ष नको आहे. मुख्यमंत्र्यांनी संभ्रमावस्था सोडावी हद्दवाढीचा निर्णय घेताना मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पाटील यांनी संभ्रमावस्था सोडून निर्णय घ्यावा. शासकीय अहवालाच्या निकषावर निर्णय घ्यावेत, असेही आवाहन अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केले. सर्वपक्षीय कार्यकर्ते बैठकीत भाजपचे महेश जाधव, नगरसेवक भूपाल शेटे, बी. एल. बर्गे, लालासाहेब गायकवाड, सतीशचंद्र कांबळे आदींनीही मते मांडली. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, दीपा पाटील, बाबा पार्टे, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.