शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील अभियंता संतोष महाजन यांचे दातृत्व, महापालिकेला देणार ५० हजार शेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:50 IST

सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून मूळचे कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला मदत म्हणून ५० हजार शेणी देणार आहेत. 

ठळक मुद्देअमेरिकेतील अभियंता संतोष महाजन यांचे दातृत्व कोल्हापूर महापालिकेला देणार ५० हजार शेणी

कोल्हापूर- सोशल मीडियावर शेणी दान बद्दल माहिती वाचून मूळचे कोल्हापूरचे पण सद्या नोकरीनिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये असणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय महाजन हे कोल्हापूर महानगरपालिकेला मदत म्हणून ५० हजार शेणी देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सर्व स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शेणीचा तुटवडा जाणवत आहे. याबद्दल सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यम यातून शेणी दानबद्दल आवाहन करण्यात आले होते.डॉ .डी. वाय.पाटील पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी याबद्दल आपल्या कॉलेजमधील मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर माहिती दिली होती. याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले.संतोष यांनी १९९८ मध्ये कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील इंजिनीरिंग कॉलेज मधून बी.ई. कंप्युटर ही पदवी घेतली आहे. ते सद्या अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये पत्नी आदिती, मुले मोहित आणि अवधूत यांच्या सोबत राहतात.

वॉलमार्ट आयएनसी या बहुराष्ट्रीय कंपनीत ते सॉफ्टवेअर इंजिनीअर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची आई श्रीमती मंगल आणि भाऊ सुधीर हे कोल्हापूरात साळोखेनगर येथे राहतात. सामाजिक उपक्रमात सक्रिय असणाऱ्या संतोष यांनी सातासमुद्रापार राहून आपल्या शहराबद्दल दाखवलेली ही कृतज्ञता कोल्हापूरची माणुसकी आणि दातृत्व अधोरेखित करणारी आहे.

कोल्हापूरने भरभरून दिलंमाझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरात झाले.मला कोल्हापूरने भरभरून दिले आहे.त्यामुळे कोल्हापूरबद्दल मनात कायम आपुलकी आणि प्रेम आहे. यातून ही छोटी मदत मी केली .-संतोष महाजन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर