शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘आंबेओहळ’साठी ‘चित्री’च्या जमिनी १४१ भूखंड रखडले : ताबाच नसल्याने लिंगनूर, कडगाव येथील गावठाणे चिकोत्रा प्रकल्पासारखी वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:36 IST

उत्तूर : एकीकडे जमीन वाटपाची प्रक्रिया रखडली असताना गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर, कडगाव येथील १४१ भू-खंड वाटप प्रक्रिया रखडली आहे. वीस वर्षांनंतरही कुणाला कोठे भूखंड

रवींद्र येसादे ।उत्तूर : एकीकडे जमीन वाटपाची प्रक्रिया रखडली असताना गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर, कडगाव येथील १४१ भू-खंड वाटप प्रक्रिया रखडली आहे. वीस वर्षांनंतरही कुणाला कोठे भूखंड मिळणार याचा ठावठिकाणा नाही. १८ नागरी सुविधा मंजूर झालेल्या भूखंडावर शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र, ताबाच नसल्याने चिकोत्रा प्रकल्पासारखी ही गावठाणे पडून आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी चित्री धरणासाठी आरक्षित केलेल्या जमिनीवर ए. आय. ए. होणे प्रलंबित आहे.लिंगनूर येथे ६० भूखंड पाडले आहेत. रस्ते, गटर्स, शौचालये, शाळा इमारत बांधून दोन वर्षे झाली आहेत. भूखंडाचा व इमारतीचा वापर नसल्याने दुरवस्था सुरू झाली आहे. लिंगनूर येथील भूखंडामध्ये आंबेओहळ नाल्यामधून जॅकवेलची उभारणी करून भूखंडाच्या ठिकाणी पाणी आणण्यात आले आहे. समाजमंदिर, अंगणवाडी इमारत, शौचालय, वीज, आदींची उभारणी केली आहे. रस्त्यांचे खडीकरणही झाले आहे.मुमेवाडी-कडगाव मार्गावर असणारे कडगाव हद्दीतील ८१ भूखंड धारकांना द्यायचे आहेत. तेथेही लिंगनूर वसाहतीसारख्या सुविधा उपलब्ध आहे. मात्र, मुख्य रस्त्याची दुरवस्था आहे. इमारती वापराविना पडून असल्याने त्वरित प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप होणे आवश्यक आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटपाचे नियोजनही कासव गतीनेच आहे.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उत्तूर, करपेवाडी, आर्दाळ या गावांमधील पात्र प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध जमीन ४४.४९. हेक्टरआहे. त्याचे वाटप प्रांताधिकारी कार्यालय गडहिंग्लज स्तरावरसुरू असल्याचे सांगण्यात येते.तर गडहिंग्लज व बेकनाळ असेमिळून ७२.८० क्षेत्राचे व चित्री लाभक्षेत्रातून भडगाव, बेळगुंदी, गडहिंग्लज, दुंडगे, हसूरचंपू, हेब्बाळ, नूल, जरळी, हिरलगे, हरळी या ११ गावांतील भू-संपादन नवीन कायद्यानुसार ए.आय.ए. होणे प्रलंबित आहे. या जमिनी लवकर संपादित झाल्यास धरणग्रस्तांना वाटप होऊ शकतात.भूखंडांचा आराखडा तयार नाहीभूमीहिन धरणग्रस्तांचे गावठाण संदर्भात फॉर्म भरून घेतले. कोणाला कोणता भूखंड किती स्वे. चा मिळणार याची माहिती धरणग्रस्तांना नाही.शेजारील चिकोत्रा मध्यम प्रकल्पाच्या वसाहतीची दुरवस्था झाली आहे तशी अवस्था लिंगनूर, कडगाव येथील भूखंडांची नको अशी व्यथा धरणग्रस्त मांडत आहेत. जखेवाडी येथेही धरणग्रस्तांना भूखंड देण्याचे नियोजन आहे. मात्र, त्याचा कोणताही आराखडा तयार नाही. मात्र, धरणग्रस्तांसाठी आरक्षित आहे.लिंगनूर येथील भूखंड सपाट जागेवर आहेत, तर कडगाव येथील भूखंड चढ-उताराचे असल्याने सपाटीकरणकरून देणे गरजेचे आहे; मात्र तसे कोणतेही नियोजन नसल्याने धरणग्रस्तांनी नापसंती व्यक्त केलीआहे.दोन्ही भूखंडाचे मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते खडी-डांबरीकरणाने जोडणे गरजचे आहे. मात्र, खडीकरणाची तरतूद असल्याने डांबरीकरण नाही. भूखंड ताब्यात मिळेपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय होणार आहे.लिंगनूर येथील भूखंडावर प्रकल्पग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या सुविधा, तर दुसºया छायाचित्रात कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे भूखंडावरील रस्ता व अन्य कामे.