शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

अंबाबाई किरणोत्सवाची दुर्बिणीद्वारे होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:15 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवास उद्या, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्यां मोठ्या दुर्बिणीद्वारे किरण मार्गातील अडथळ्यांची तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देअंबाबाई किरणोत्सवाची दुर्बिणीद्वारे होणार तपासणीढगाळ वातावरणानंतर पितळी उंबऱ्यापर्यंत किरणे पोहोचली

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवास उद्या, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्यां मोठ्या दुर्बिणीद्वारे किरण मार्गातील अडथळ्यांची तपासणी केली जाणार आहे.वर्षातून दोन वेळा होणाºया अंबाबाई देवीच्या किरणोत्सव मार्गात मानवनिर्मित अडथळे मोठ्या प्रमाणात आहेत; त्यामुळे ते दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सातत्याने प्रयत्नशील आहे, तर अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर हेही आपल्या अभ्यासक विद्यार्थ्यांसह देवीच्या मूर्तीपर्यंत तीव्र क्षमतेची किरणे विनाअडथळा कशी पोहोचतील यांचा अभ्यास व अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवीत आहेत.

त्यानुसार बुधवारी सायंकाळी प्रा. कारंजकर यांच्या अभ्यासपथकाने सायंकाळी पाच वाजल्यापासून किरणांचा अभ्यास केला. प्रथम ५.३० वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पाच वाजून ३७ मिनिटांनी वातावरणात बदल होत गेला. त्यानंतर किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहोचली.

या ठिकाणी नियमित वातावरणात किरणे १५० लक्स इतक्या तीव्र क्षमतेची लागतात; मात्र बुधवारी सायंकाळी ढगाळ वातावरणानंतर ९९ लक्स इतकी किरणांची तीव्रता मिळाली; त्यामुळे आज, गुरुवारी सायंकाळी किरणांची तीव्रता वाढेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला, तर सायंकाळी पाचनंतर किरणोत्सव मार्गात अडथळा कोणत्या ठिकाणाहून होतो, याबाबत आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या दुर्बिणीचा वापर केला जाणार आहे.

अडथळे दूर करण्यासाठी देवस्थानकडून दक्षता घेण्यात आली आहे. भाविकांना किरणोत्सवाचा सोहळा विनाअडथळा पाहण्यास मिळावा; याकरिता मंदिर परिसरात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली जाणार आहे.- विजय पोवार,सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर