शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:22 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशुद्धिकरण यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अंबाई’ तलाव पुन्हा बंदजलतरणपटूंची गैरसोय; वारंवार बिघडणारी यंत्रणा बदलण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शहरातील सर्वांत कमी दर असणारा आणि सर्वसामान्य जलतरणपटूंचा एकमेव आधार असणारा हा तलाव आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये या तलावावर भरगच्च गर्दी असते. तासाला २० रुपये असा या जलतरण तलावाचा दर आहे; त्यामुळे तो वर्षातील सर्व महिने गर्दीचा असतो.

सध्या त्याची शुद्धिकरण यंत्रणा (फिल्टरेशन प्लँट) कुचकामी आहे. दिवसातील १० तासांपेक्षा अधिक काळ शुद्धिकरणाची मोटर सुरू ठेवावी लागते. तरीही हा तलाव पूर्णत: शुद्ध होत नाही. पोहणाऱ्यांची संख्या आणि ४० वर्षांपूर्वीची तलावाची शुद्धिकरण यंत्रणा यांचा ताळमेळ बसत नसल्याने यंत्रणेत वारंवार बिघाड ठरलेलाच असतो.

२० ते ३० जूनदरम्यान पाणी प्रदूषित झाले म्हणून तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यातील पाणी दुर्गंधीयुक्त व हिरवेगार दिसू लागले आहे; त्यामुळे तलाव १७ जुलैपासून पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आता २३ आॅगस्टपासून हा शुद्धिकरण यंत्रणेतील ‘बॅकवॉश पंप’ नादुरुस्त झाल्याने तलाव गेल्या १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा पंप दुरुस्त करून बसविला आहे; मात्र तलावातील पूर्ण पाणी शुद्धिकरण होण्यासाठी अजूनही चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) पासून तो पूर्ववत होण्याची शक्यता आहे.ही यंत्रणा बदलामहापालिकेचा वर्षातील सहा महिने गर्दीचा एकमेव तलाव असून त्याकडे पोहणाऱ्या अबालवृद्धांचा ओढा अधिक आहे. त्यात ४० वर्षांपूर्वीची शुद्धिकरण यंत्रणा तिच्या कालमर्यादेनुसारवारंवार बिघडते. तरीही येथील कर्मचारी ती रात्रीचा दिवस करून पुन्हा पूर्ववत करतात. प्रशासनाने तलावातील शुद्धिकरण यंत्रणाच नवीन बसवून हा तलाव कायमस्वरूपी पोहण्यासाठी खुला करावा व स्पर्धेची तयारी करणाºया जलतरणपटूंची गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर