शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या गाभाऱ्याचे होणार ३६० अंश कोनातून दर्शन, कंपनीकडून प्राथमिक चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:46 IST

करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याचे आता ३६० अंश कोनातून दर्शन होणार आहे. याबाबतची प्राथमिक चाचपणी, मंदिराचे चित्रीकरण, छायाचित्रण काल्पनिक संकल्पचित्र या संस्थेकडून करण्यात आले आहे. संस्थेचे ‘व्ही. आर. डिव्होटी’ हे अ‍ॅप्लिकेशन आवडल्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याला परवानगी दिली जाईल.

ठळक मुद्देअंबाबाईच्या गाभाऱ्याचे होणार ३६० अंश कोनातून दर्शनकंपनीकडून प्राथमिक चाचपणी

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याचे आता ३६० अंश कोनातून दर्शन होणार आहे. याबाबतची प्राथमिक चाचपणी, मंदिराचे चित्रीकरण, छायाचित्रण काल्पनिक संकल्पचित्र या संस्थेकडून करण्यात आले आहे. संस्थेचे ‘व्ही. आर. डिव्होटी’ हे अ‍ॅप्लिकेशन आवडल्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याला परवानगी दिली जाईल.सध्या अंबाबाई देवीच्या मूर्तीचे आॅनलाईन दर्शन सुरू असते. याद्वारे भाविक केवळ अंबाबाईची मूर्ती पाहू शकतात. मात्र ‘व्ही. आर. डीव्होटी’ हे असे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे तुम्ही पूर्ण मंदिर मोबाईलवर पाहू शकता. सुरू असलेल्या स्क्रीनवर बोट फिरविले की, पूर्ण मंदिराचा व्ह्यू आपल्याला दिसेल. हे अ‍ॅप सध्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय भारतातील काही मंदिरांमध्येही ते सुरू आहे.

देशातील ५१ शक्तिपीठांमध्ये समावेश असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही हे अ‍ॅप बसविण्याचा प्रस्ताव ‘काल्पनिक इमॅजिन बिर्इंग देअर’ या संस्थेने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसमोर ठेवला. प्राथमिक सुरुवात म्हणून समितीने सदर संस्थेला अ‍ॅपची पूर्वतयारी म्हणून गाभाऱ्याचे चित्रीकरण व छायाचित्रणासाठी परवानगी दिली. त्यानुसार गेले दोन दिवस मंदिरात हे काम सुरू होते.

या चित्रीकरण व छायाचित्रणाच्या आधारे संबंधित कंपनी अ‍ॅप तयार करून देवस्थान समितीला दाखविणार आहे. समितीला हे अ‍ॅप पसंत पडल्यास अंबाबाई मंदिरातदेखील पुढील दोन महिन्यांत हे अ‍ॅप कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती समितीचे सचिव विजय पोवार यांनी दिली.

 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूरMobileमोबाइल