शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
3
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
4
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
5
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
6
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
7
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
8
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
9
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
10
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
11
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
12
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
13
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
14
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
15
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
16
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
17
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
18
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
19
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
20
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई-त्र्यंबोली सखींची उद्या भेट, दहा वर्षाची स्वरा करणार कोहळा भेदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:55 IST

त्र्यंबोली यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची उद्या शनिवारी सह्दय भेट होणार आहे. ललिता पंचमीच्या याेगावर त्र्यंबोली यात्रा होत असून यात गुरव घराण्यातील स्वरा जयदीप गुरव ही दहा वर्षाची चिमुरडी राक्षसरूपी कोहळा भेदनाचा विधी करणार आहे. ती विद्यापीठ शाळेत चौथीच्या वर्गात शिकत आहे. या यात्रेसाठी अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क केले जात आहे. पालखी मार्गावर अंबाबाईच्या स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. तिथे छत्रपतींच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन व तिच्या हस्ते कोहळा भेदन्याचा विधी होतो. या यात्रेसाठी सकाळी १० वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती असलेली पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोलीसाठी निघते. भवानी मंडप, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक, टाकाळा ते त्र्यंबोली मंदिर असा पालखी मिरवणुकीचा मार्ग असतो. याच मार्गाने सायंकाळी पालखी मंदिरात परत येते.नवरात्रौत्सव सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या, खणीची स्वच्छता करण्याच्या, पालखी मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेतर्फे बुधवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. कोटीतीर्थ, टाकाळा येथील खणीची स्वच्छता केली जात आहे.इच्छुकांच्या कमानी..त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या मात्र स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी आपल्या छायाचित्रासह उभारलेल्या या कमानीत पालखी व भाविकांचे स्वागत केले आहे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आपल्या ब्रँडिंगची ही संधी सोडलेली नाही.

अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणारत्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी शनिवारी (दि. २७) त्र्यंबोली मंदिरकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.शनिवारी सकाळपासूनच टेंबलाई उड्डाणपुलापासून पुढे उचगावच्या दिशेने जाणारी खासगी वाहतूक बंद केली जाणार आहे. उचगाव, टेंबलाईवाडीकडून शहरात येणारी वाहने शाहू नाका, सायबरमार्गे शहरात येतील. ताराराणी चौकातून उड्डाणपूलमार्गे महामार्गाकडे जाणारी वाहने शिरोली नाक्याकडून महामार्गावर वळविण्यात आली आहेत. टाकाळा चौकातून पुढे कोयास्को चौकाकडे जाणारी वाहतूक वि. स. खांडेकर मार्गावरून राजारामपुरीतून सायबरच्या दिशेने वळविण्यात आली आहे. अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाताना गरजेनुसार पालखी मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Ambabai and Tryamboli's reunion; girl to pierce gourd.

Web Summary : Ambabai's palanquin will visit Tryamboli, with a young girl performing the gourd piercing ritual. The route is prepared with road repairs and welcome arches. Traffic will be diverted, and heavy vehicles are restricted on Saturday for the journey.