शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:28 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिराला लागते वर्षाला साडेनऊशे किलो कुंकूनवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी

इंदुमती गणेश कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला जातो. नवरात्रौत्सवात कुंकवाची सर्वाधिक मागणी असते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला ५० ते ६० लाख भाविक येतात. देवीची महती सर्वदूर पसरल्याने या भाविकसंख्येत वाढ होत आहे. त्यात आॅनलाईन दर्शनसुविधेमुळे त्यात देशविदेशांतील भाविकांचीही भर पडली आहे.

स्त्रीदैवत म्हटले की कुंकवाचे महत्त्व ओघाने आलेच. त्यात आदिशक्ती अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधींचे वेगळेपण आहे. अंबाबाईचे मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडते. तेव्हापासून देवीची काकड आरती, सकाळी सहा, साडेआठ आणि ११ वाजता असे तीन वेळचे अभिषेक, दुपारची आरती, त्यानंतरची सालंकृत पूजा, शेजारती असे नित्य व नैमित्तिक विधी पार पडतात. रात्री १० वाजता गाभारा बंद होतो. पालखी सोहळा असेल त्या दिवशी थोडा उशीर होतो. याशिवाय सण, उत्सव, समारंभाच्या निमित्ताने विशेष पूजा बांधल्या जातात. नवरात्रौत्सवाच्या काळात अभिषेकांची संख्या दुपटीने वाढते.वरील सर्व धार्मिक कृत्यांसाठी कुंकू मोठ्या प्रमाणात लागते. ते हळदीपासून बनविलेले व शुद्ध प्रतीचे असावे लागते. त्यासाठी नुकतीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निविदा काढली आहे. ती दोन वर्षांसाठी देण्यात येणार असून, त्यासाठी तीनजणांनी अर्ज केला आहे.वर्षभर लागणारे कुंकू

  • दैनंदिन धार्मिक विधी : ३५० किलो
  • नवरात्रौत्सवात लागणारे कुंकू : ७० किलो
  • वर्षभरातील कुंकुमार्चन विधी : ४० किलो
  • ७०० महिलांचा सामुदायिक कुंकुमार्चन विधी : ७० किलो.

प्रसाद पाकिटे ८८ हजारअनेक परस्थ भाविक देवस्थान समितीकडे शाश्वत पूजेसाठीची पावती करून जातात. अशा भाविकांना समितीच्या वतीने प्रसादाचे पाकीट पोस्टाने अथवा कुरिअरने पाठविले जाते. त्यात हळदी-कुंकू, साखर आणि फुटाण्यांचा समावेश असतो. याशिवाय अभिषेकासह विविध धार्मिक विधींनंतर भाविकांना हे प्रसाद पाकीट दिले जाते. वर्षाला ८८ हजारांहून अधिक पाकिटे लागतात. त्यांपैकी केवळ नवरात्रौत्सवातील पाकिटांची संख्या ११ हजार आहे.साडेसातशे लिटर दूध, दोनशे लिटर दहीदेवीच्या पंचामृत अभिषेकासाठी दूध व दहीदेखील मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी महिन्याला किमान ६२ लिटर दूध आणि १६ लिटर दही वापरले जाते. अशा रीतीने वर्षाला साडेसातशे लिटर दूध व दोनशे लिटर दही लागते; तर साखर ५० किलो, मध चार किलो लागतो.तीन हजार केळीसमितीच्या अखत्यारीत असलेल्या ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर व बिनखांबी गणेश मंदिरासाठी केळी मागविली जातात. अंगारकी संकष्टी असेल त्यावेळी दोन हजार केळी; तर दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसाठी एक हजार केळी वापरली जातात. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर