शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात ‘कुंकुमार्चन ’ उत्साहात; ७५० हून अधिक महिला भाविकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 11:59 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात कुंकुमार्चन विधी उत्साहात झाला. यात ७५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरात ‘कुंकुमार्चन ’ उत्साहात; ७५० हून अधिक महिला भाविकांचा सहभागदेवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधी

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात कुंकुमार्चन विधी उत्साहात झाला. यात ७५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी १0 लाखांचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात ‘कुंकुमार्चन’ विधी  सोहळ्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या./छाया : आदित्य वेल्हाळअंबाबाई मंदिरात प्रत्येक शुक्रवारी देवस्थानतर्फे गरुड मंडप येथे देवीचा कुंकुमार्चन विधी संपन्न होतो. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभतो. त्यात दररोज हजारो महिलांची या विधीसाठी समितीकडे नाव नोंदणी होते. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी समितीतर्फे शुक्रवारी दुपारी ५०१ महिलांकरिता हा विधी आयोजित करण्यात आला होता. त्यात ७५० हून अधिक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या उपक्रमात सहभागी महिलांना ‘श्रीयंत्र ’, हळद-कुंकू, प्रसाद आणि साहित्य देवस्थानतर्फे पुरवण्यात आले होते. एकाचवेळी ७५० हून अधिक महिलांनी एकत्रितपणे कुंकुमार्चनमध्ये सहभाग नोंदवला. संपूर्ण विधी योगेश व्यवहारे आणि सुदाम सांगले पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात ‘कुंकुमार्चन’ विधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या./छाया : आदित्य वेल्हाळदेवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यानिमित्त बोलताना म्हणाले, महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून हा विधी यापुढे मोठ्या प्रमाणात राबविला जाईल. त्याचा लाभ स्थानिक भाविकांसह बाहेरून आलेल्या भक्तांनाही होईल. यासह देवस्थानतर्फे सुरू असलेल्या आरोग्य केंद्रातून तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रतिसाद पाहून देवस्थानतर्फे रुग्णवाहिकेचीही सोय केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, सुदेश देशपांडे, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाखांचा निधी शुक्रवारी देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, सदस्या संगीता खाडे, विजय पोवार, आदींच्या उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे सुपूर्द केला./छाया : आदित्य वेल्हाळ 

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांचा निधीदेवस्थान समितीच्या सामाजिक सहायता निधीतून केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरूपात अध्यक्ष महेश जाधव यांनी सुपूर्द केला. हा निधी केरळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे समितीतर्फेच पाठविला जाणार आहे. यासह पोलीस कल्याण निधीसाठी २ लाखांचा धनादेश शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे सुपूर्द केला.

 

 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर