शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

अंबाबाई मंदिर समितीची आठ दिवसांत स्थापना शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:00 IST

Mahalaxmi Temple Kolhapur, Religious Places अंबाबाई, जोतिबासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तीन हजार मंदिरांचे व्यवस्थापन करणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आठ दिवसांत बरखास्त होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे संजय पाटील, व्ही. बी. पाटील यांच्या नावाची चर्चादेवस्थान समिती आठ दिवसांत बरखास्त होण्याची शक्यता

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तीन हजार मंदिरांचे व्यवस्थापन करणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आठ दिवसांत बरखास्त होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाच्या पातळीवर याबाबत जोरदार हालचाली सुुरू असून, देवस्थान समितीसोबत स्वतंत्र अंबाबाई मंदिर समितीदेखील स्थापन होणार आहे. देवस्थान समिती अध्यक्षपदासाठी व्ही. बी. पाटील, भैया माने आणि अंबाबाई मंदिर समिती अध्यक्षपदासाठी संजय डी. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचे आपले पद कायम राहावे यासाठी प्रयत्न आहेत.व्ही. बी. पाटील यांचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. पक्षाशी व पवार यांच्याशी गेली अनेक वर्षांचा त्यांचा संबंध आहे. अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दाला फार महत्त्व असेल. हे पद भैया माने यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे दिसते.

देवस्थान समिती कार्यकारिणी अध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि पाच सदस्य अशा सातजणांची आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर २०१७ साली समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे महेश जाधव आणि कोषाध्यक्षा म्हणून वैशाली क्षीरसागर यांची निवड झाली.

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्या बरखास्त केल्या होत्या. मात्र राज्यातील प्रमुख देवस्थान समित्यांबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.शिर्डीसाठी काँग्रेस आग्रहीमुंबईचे सिद्धिविनायक देवस्थान आता शिवसेनेकडे आहे. आदेश बांदेकर हे त्याचे अध्यक्ष असल्याने ही समिती बरखास्त होण्याची शक्यता नाही. शिर्डीमध्ये सध्या प्रशासक मंडळ आहे. या देवस्थानासाठी काँग्रेस आग्रही आहे.

परंतु अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने हे देवस्थान राष्ट्रवादीला मिळावे असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह आहे. परंतु ते काँग्रेसकडेच राहू शकते. त्यामुळे पंढरपूर आणि कोल्हापूरचे देवस्थान राष्ट्रवादीला मिळू शकते.अंबाबाई मंदिर समितीसाठी रस्सीखेचअंबाबाईला घागरा-चोली नेसवल्याच्या जून २०१७ सालच्या प्रकरणानंतर पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा एप्रिल २०१८ मध्ये झाला. त्यानुसार अंबाबाई मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीपासून अलग करण्यात आले आहे. ही समितीच सर्व नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय असल्याने त्यावरील नियुक्तीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. या समितीवर महापौर हे कायमस्वरूपी सदस्य असतील. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, दोन महिला, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीमधील यांच्यासह ११ सदस्य असतील.

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे