शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी ‘अमन’ दिशादर्शक ठरेल : अमन मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:59 IST

दिव्यांग व स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फौंडेशनच्या माध्यमातून चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम गरजंूना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी येथे काढले.

ठळक मुद्दे दिव्यांगांसाठी ‘अमन’ दिशादर्शक ठरेल : अमन मित्तल प्रौढ स्वावलंबन कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर : दिव्यांग व स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फौंडेशनच्या माध्यमातून चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम गरजंूना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी येथे काढले.नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंपॉवरमेंट आॅफ पर्सन विथ मल्टिपल डिसअ‍ॅबिलिटिस (निम्पमेड) व अमन न फौंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सीपीआरच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिव्यांग राष्ट्रीय सल्लागार सुधीर भाले (हैद्राबाद), अमन फौंडेशनच्या संस्थापिका दीपा शिपूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. नागाळा पार्कातील एका हॉलमध्ये या कार्यशाळेला सुरुवात झाली.मित्तल म्हणाले, बदलती जीवनशैली , राहणीमान, आदी विविध कारणांमुळे दिव्यांग, आॅटिझम यासारखे प्रमाण वाढत चाललेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणत: तीन हजार आॅटिस्टिक मुले आहेत. या मुलांकरिता वेगळ्या पद्धतीचे शिक्षण व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असून, ‘अमन’च्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्यास जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी अशा मुलांचा शोध घेऊन पुढील शिक्षणासाठी प्रयत्न केले जातील.सयाजी शिंदे म्हणाले, दिव्यांगजणांसाठी काम करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध माध्यमातून प्रशिक्षणाद्वारे अशा मुलांना स्वावलंबी बनविण्याची गरज आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृती झाली पाहिजे. याच भावनेतून ‘अमन’च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आॅटिझमसाठी कार्य सुरू केले.दीपा शिपूरकर यांनी संस्थेच्या व स्वमग्न मुलांकरिता सुरू केलेल्या कार्याची माहिती प्रास्ताविकेत दिली. सुधीर भाले यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना व सवलती यांची माहिती दिली. डॉ. सुप्रिया देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यशाळेमध्ये राज्यांच्या विविध जिल्ह्यांतून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणार्थींना ३० सीआरई पॉर्इंटस् मिळणार आहेत. यावेळी संदीप पाटील, शिवकुमार पेडणेकर, सागर परीट, प्रतीक सोळांकूरकर, आदी उपस्थित होते. कपिल मुळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयkolhapurकोल्हापूरHealthआरोग्य