शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:11 IST

कोल्हापूर :  कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज भरला. पालकमंत्री चंद्रकांत ...

ठळक मुद्देकार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांनी भरला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर

कोल्हापूर :  कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज भरला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, संघटनमंत्री बाबा देसाई, महानगरजिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.

करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेवून बिंदू चौकातील भाजप कार्यालयात सकाळी सव्वा दहा वाजता आल्यानंतर बिंदू चौकापर्यंत चालत येवून तेथून वाहनात बसून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्याबरोबर भाजपच्या टोप्या, स्कार्फ घातलेले कार्यकर्ते दुचाकी, चारचाकी वाहनांतून कार्यकर्ते आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिला-पुरुष कार्यकर्ते थांबून होते. पालकमंत्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महाडिक, संघटनमंत्री देसाई, आदींच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे सादर केला.

यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे, नगरसेवक ईश्वर परमार, शेखर कुसाळे, अशोक देसाई, नगरसेविका उमा इंगळे, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य प्रताप कोंडेकर, आदी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री पाटील पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

थोड्यावेळाने आमदार हाळवणकर यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांचा दुसरा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांचाही अर्ज भरण्यात आला. अर्ज भरून आलेल्या आमदार महाडिक यांचे भाजप, महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर आणि विजयाच्या घोषणा देत शुभेच्छा दिल्या. 

 

टॅग्स :BJPभाजपाAmal Mahadikअमल महाडिकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी