शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापुरात 'या' परिसरात होतो सोने लुटण्याचा मोठा सोहळा

By संदीप आडनाईक | Updated: September 20, 2025 18:14 IST

पंचगंगेवर अंबाबाई-रंकभैरवाची पालखी भेट, जप्तनमुलुख-जाधव यांच्याकडे मान

संदीप आडनाईककोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवासोबतच ‘कोल्हापूरचा रक्षक’ म्हणजे क्षेत्रपाल रंकभैरवाच्या नवरात्रोत्सवालाही मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापूरकरांना माहिती नसलेला हा सोने लुटण्याचा मोठा सोहळा शहाजी वसाहतीमधील गंजी माळावर म्हणजे आजच्या टिंबर मार्केट परिसरातही थाटात साजरा होतो.अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेला महालक्ष्मी बँकेसमोरच्या छोट्या बोळात सातव्या-आठव्या शतकातील श्री रंकभैरव स्वतंत्र तटबंदी युक्त हेमाडपंथी शैलीतील मंदिरात विराजमान आहे. दहाव्या पिढीतले राहुल जप्तनमुलुख-जाधव हे या मंदिराचे सध्या व्यवस्थापन पाहतात. करवीरचे श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या राजवटीतील सरदार रेखुजी बिन नरसोजीराव जाधव-जप्तनमुलुख यांनी लढाईत मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना जप्तनमुलुख आणि सरनोबत हे दोन किताब मिळाले. त्यामुळे दसऱ्याच्या सोहळ्याचा मान 'जाधव-जप्तनमुलुख' घराण्याला आहे.रंकभैरवाचा नवरात्राैत्सवरंकभैरवाचा नवरात्रीत विशेष उत्सव असतो. देवाचा पालखी सोहळा अश्विन शुद्ध पंचमीला सुरू होतो. महाअष्टमीच्या दिवशी देवीचा रोशन नाईक चोपदार देवीचा सुवर्णदंड घेऊन रंकोबा पुढे येऊन अंबाबाईची ललकारी देतो नंतर रंकनाथ सदरेवरून मंदिरात येतात. महानवमीला रंकभैरव स्वतःच्या तीर्थात म्हणजे रंकाळ्यात स्नान करतात. दसऱ्या दिवशी अंबाबाईची आणि भवानीची पालखी दसरा चौकाकडे निघते. त्याचवेळी रंकभैरवाची पालखी गंजीमाळाकडे निघते.

दगडी तख्तावर धार्मिक विधीरंकभैरवाची पालखी टिंबर मार्केट परिसरातील भुजंगा लक्ष्मण काशीद यांनी १९३१ मध्ये बांधलेल्या रंकभैरवाच्या दगडी सदरेवर (तख्त) जाऊन थांबते. तेथे धार्मिक विधीनंतर एका घराच्या छतावरून आपट्याच्या पानाच्या छोट्या फांद्या भाविकांकडे फेकल्या जातात. भाविक तीच पाने सोन्याचे प्रतीक म्हणून लुटतात.अंबाबाई-रंकभैरव भेटीचा मार्गरंकभैरव मंदिर - मिरजकर तिकटी - नंगीवली चौक - टिंबर मार्केट - उभा मारुती चौक - रंकाळा/राजघाट- उत्तरेश्वर पेठ - पंचगंगा नदी - गंगावेश - बाबूजमाल दर्गा - वांगी बोळ- बिनखांबी गणेश मंदिर चौक आणि पुन्हा श्री रंकभैरव मंदिरात आगमन अशी पालखी निघते. पंचगंगा नदीवर गुरू महाराज समाधी मंदिराजवळ अंबाबाईशी त्यांची भेट होते. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे आल्यानंतर नवरात्रौत्सवाची सांगता होते.