शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा प्रवास सोबतच... एकमेकांचे हात पकडून वृद्ध दाम्पत्याची रंकाळ्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 10:58 IST

Kolhapur :  ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. 

कोल्हापूर : दीर्घ आजारास कंटाळून वृद्ध दाम्पत्याने एकमेकांचे हात धरून रंकाळा तलावात उडी टाकून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. विजयमाला पाटील (वय ७५) व धोंडिराम बळवंत पाटील (८० दोघेही रा. जाधववाडी. मूळ धोंडिराम पाटील विजयमाला पाटील रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.  ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जुन्या काळातील न्यू आनंद सायकल कंपनीचे मालक धोंडिराम पाटील व त्यांच्या पत्नी विजयमाला हे महाडिक कॉलनीत मुलांसह राहत होते; पण आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी महाडिक वसाहतमधील घर विकले. त्यानंतर ते मुलांसह पाटोळेवाडीत राहिले. वृद्धापकाळात दोघांनाही दीर्घ आजार जडल्याने ते वैतागले होते. विजयमाला यांना फिटचा त्रास होता.

शनिवारी सायंकाळी सायंकाळी दोघेही रंकाळा येथे फिरण्यासाठी गेले. त्याच रात्री तलावात उडी मारून आत्महत्या केली. रविवारी रात्री विजयमाला यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला; पण ओळख न पटल्याने तो बेवारस म्हणून सीपीआर रुग्णालयात ठेवला होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी धोंडिराम पाटील यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी पाण्यावर तरंगताना आढळला. 

जुना राजवाडा पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून सीपीआरमध्ये आणला. त्यांच्या पँटच्या खिशात दोन ओळखपत्रे सापडली. त्यात विजयमाला पाटील यांचाही फोटो व नाव होते. पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून घेतल्यानंतर दोघांचीही ओळख पटली.  सीपीआरमध्ये आई-वडिलांचा मृतदेह पाहून मुलांनी हंबरडाफोडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. आजाराला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अखेरचा प्रवास सोबतच...मुले मोठी झाल्याने त्यांना आपला त्रास नको म्हणून त्यांना पाटोळेवाडीत ठेवून धोंडिराम व विजयमाला हे दाम्पत्य मुलीच्या लग्नानंतर जाधववाडीत भाड्याची खोली घेऊन स्वतंत्रपणे राहिले. त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री हाहात हात घट्ट पकडून रंकाळा तलावात आत्महत्या करून अखेरचा प्रवास सोबतच केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर