शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

पंधरा हजार कोटींची उलाढाल; ‘साखर सहसंचालक’चा डोलारा चालतो केवळ पाच कर्मचाऱ्यांवर 

By राजाराम लोंढे | Updated: January 11, 2025 16:16 IST

साखर सहसंचालकांसह निम्मी पदे रिक्त : कर्मचाऱ्यांवर ताण; कामाचा निपटारा होण्यावर मर्यादा

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले व तब्बल ४१ साखर कारखान्यांचा कारभार ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सहसंचालकांसह तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. शेतकरी संघटनांचा प्रभाव आणि १५ हजार कोटींची उलाढाल असलेल्या साखर उद्योगाच्या मुख्य कार्यालयाची ही अवस्था गेली अनेक वर्षे आहे. कारखान्यांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी होऊन वेळेत साखर आयुक्तांकडे पाठविण्याची जबाबदारी या कार्यालयाची असते. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा निपटारा करताना सध्याच्या कर्मचाऱ्यांवर ताण येतो.

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतच अधिक लक्ष द्यावे लागते. या दोन जिल्ह्यांत तब्बल ४१ सहकारी व खासगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांची वार्षिक १५ हजार कोटींची उलाढाल आहे. एवढ्या मोठ्या उद्योगाच्या प्रमुख कार्यालयाची कर्मचाऱ्यांविना दयनीय अवस्था झाली आहे. पुरेसे कर्मचारी देता येत नसतील; तर कार्यालय बंद करून थेट आयुक्त कार्यालयाशी जोडले, तर कामकाजाला वेग येऊ शकतो.पगार कारखान्यांचा, सेवा सहसंचालक कार्यालयाचीसहसंचालक कार्यालयात कर्मचारी नसल्याने जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचे कर्मचारी तिथे कार्यरत आहेत. पगार कारखान्याचा काम सहसंचालक कार्यालयाचे सुरू आहे. त्याशिवाय लेखापरीक्षण विभागातील लेखापरीक्षकही मदतीस आहेत, म्हणून तरी कामकाज सुरू आहे.

सहसंचालकांच्या खुर्चीवर प्रभारीचप्रादेशिक साखर सहसंचालक हे जबाबदारीचे पद आहे मात्र, गेल्या दीड वर्षापासून अशोक गाडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्तच आहे. उपसंचालक गोपाल मावळे यांच्याकडे पदभार असून गेल्या पाच वर्षांतील बहुतांश महिने या खुर्चीवर प्रभारीच बसले आहेत.आयुक्त कार्यालयाच्या दुरुस्तीलाही शेतकऱ्यांचे पैसे?पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाच्या टोलेजंग इमारतीच्या बांधकामासाठी साखर कारखान्यांकडून टनाला पैसे घेतले होते. आता, त्याची दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी कारखान्यांकडून, पर्यायाने शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे समजते.

म्हणूनच अधिकाऱ्यांची ‘कोल्हापूर’कडे पाठइतर विभागांच्या तुलनेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखानदार हे ‘हेवीवेट’ नेते असल्याने सर्वच गोष्टींवर मर्यादा येतात. त्याचबरोबर येथे शेतकरी संघटना आक्रमक असल्याने येथे सहसंचालक म्हणून येण्यास फारसे कोणी इच्छुक नसतात.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील आस्थापनापदाचे नाव  - मंजूर पद  - रिक्तसहसंचालक - ०१  - ०१उपसंचालक - ०१   -  -कृषी अधिकारी  - ०१    -कार्यालयीन अधीक्षक - ०१ - ०१सह. अधिकारी श्रेणी - २  - ०२     -वरिष्ठ लिपिक  - ०१     -कनिष्ठ लिपिक - ०१  - ०१स्टेनो   - ०१  - ०१चालक - ०१  - ०१

कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या साखर उद्योगाकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे यावरून स्पष्ट होते. जग चंद्रावर गेले; पण, सहसंचालक कार्यालय अजूनही फाइलीमध्येच अडकून पडले. संघटना आक्रमक आहे, साखर कारखानदार मोठे नेते असल्याने सगळे सोपस्कार पूर्ण करून येथे येण्यास अधिकारी तयार नसतात, ही वस्तुस्थिती आहे. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी