शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरण उंचीविरोधात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:07 IST

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे .

ठळक मुद्देअलमट्टी धरण उंचीविरोधात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरूमहाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला इशारा

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे समजले. ही उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्या वतीने रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे .अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्याचा निर्णय अद्याप नाही तोवर कर्नाटक सरकार आडमुठे धोरण घेऊन उंची वाढवण्यासाठी आग्रही आहे. मागील वेळी राज्यकर्त्याच्या चुकीच्या भुमिकेमुळेच धरणाची उंची वाढविली व त्याचा फटका महाप्रलंयकारी महापुराने वरील जिल्ह्यातील जनतेला बसला.

कर्नाटक शासनाने धरणाची उंची ५१० कायम ठेवावी. त्याच्यावर उंची वाढवू नये. लोकभावना एवढ्या तीव्र आहेत की अलमट्टी धरणाचे अस्तित्वच राहणार नाही, याची दखल केंद्र सरकारने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.गेल्या वर्षीच्या महाप्रलंयकारी महापुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. सदर महापुरास ज्याप्रमाणे अतिवृष्टी हे एक कारण आहे, त्याप्रमाणेच कर्नाटक राज्यातील हिप्परगी व अलमट्टी ही धरणे हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत. या धरणांतील अतिरिक्त पाणीसाठा तसेच पावसाच्या प्रमाणात धरणातून योग्य वेळी पाण्याचा विसर्ग झाला नाही; त्यामुळे त्याच्या बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला बसला होता. 

टॅग्स :DamधरणKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर