शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:45 IST

collectoroffice, morcha, kolhapurnews लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांकरीता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांकरीता सोमवारी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.कोरोनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांशी संबंधित असणारे मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन आदी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. व्यावसायिक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ व्यावसायिकांना परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

यासाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महापौर निलोफर आजरेकर,नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील,उपमहापौर संजय मोहीते,आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी एक उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मागण्या अशा,

  • पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी द्या.
  • व्यावसायिकांना १८ टक्के ऐवजी ५ टक्के जीएसटी आकारावा.
  • लाईट बिले, भाडे, कर्जावरील व्याज माफ करा.
  • उद्योगाचा दर्जा द्यावा

डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.बँडपथकासह बेंजो, नाशिक ढोल, हलगी , तुतारी, ताशा, फुलवाले, सजवलेले रथ, घोडे, आदी संघटनांचे व काम करणारे असे एक हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या आंदोलकांनी काळ्या रंगाचे टि-शर्ट परिधान केले होते. मोर्चात एक हजारांहून अधिक स्त्री पुरुष सहभागी झाले होते. त्यामुळे अक्षरश: सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी