शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना एस.टीतर्फे फराळाचे वाटप, कोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:35 IST

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

ठळक मुद्देवारकरींना एस.टी तर्फे फराळाचे वाटपकोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रमअभंगाच्या गजरात पंढरपूरकडे २५ एस.टी रवाना, प्रवाशांकडून स्वागत

कोल्हापूर : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

पंढरपूर यात्रेसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची  संख्या जास्त असते. ज्या लोकांना पायी जाता येत नाहीत, त्या भाविकांसाठी एस.टी मोठा आधार असतो. एस.टी.मधून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या  भाविक प्रवांशाचे  खूप वर्षांचे जुने नाते आहे. हेच नाते अधिक दृढ करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने अनोखा उपक्रम सुरु केला.

वारीच्या मार्गावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासादरम्यान उशीर होण्याची शक्यता असते. मार्गावर त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकांतून सकाळी सजावट केलेल्या २५ एस.टी पंढरपूरकडे अभंगाच्या गजरात रवाना झाल्या.

याप्रसंगी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संदीप भोसले, आगार व्यवस्थापक अजय पाटील, सहा. वाहतूक अधिक्षक संजय शिंदे, अतुल मोरे, वाहतूक निरिक्षक शितल चिखलव्हाळे,वाहतूक नियंत्रक प्रतिक शिंदे, इफ्रान सांगावकर, यांच्यासह एस.टीचे कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

सोमवार पर्यंत सुरु राहणार उपक्रमपंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांसाठी बसमध्ये मध्यवर्ती बसस्थानकांतील पुणे पटलाजवळ गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गाडीतील भाविकांना केळी, दोन राजगिऱ्याचा लाडू व पाण्याची बाटली असा फराळ मोफत दिला जात आहे. यासह एक लहान माहिती पुस्तिका भेट दिली जात होती. त्यामध्ये आरत्यांसह एस. टी.च्या विविध योजना व वेळापत्रकाची माहितीचा समावेश आहे.

प्रवाशांकडून मदत...एस.टीतील प्रवास म्हणजे त्रासदाय किंवा चालक- वाहक किंवा स्थानकांतील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांनी मिळणारी वागणूकीमुळे एस.टीकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी वेगळा असतो. मात्र कोल्हापूर विभागाने आज भाविकांना मोफत फारळ वाटत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी स्वत:हून पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स मदत म्हणून देत,या उपक्रमाचे कौतक केले.

माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने भाविक तहान - भूक हरपलेले असते. कोल्हापूरहून त्याचा प्रवास पुढे चार ते पाच तासाचा असतो. यासर्व गोष्टीचा विचार करून हा फराळाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ होताच  चांगला प्रतिसाद मिळला आहे.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर