कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील विठ्ठल-रुखमाई पतसंस्थेबाबत आपल्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूनेच आहेत. पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा देऊन पाच वर्षांनंतर पॅकेज मिळाले. त्यामुळे पॅकेज वाटप व आपला काहीही संबंध नसल्याची माहिती ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक रणजीतसिंह पाटील यांनी दिली.
‘विठ्ठल-रुखमाई पतसंस्थाला राज्य शासनाकडून मिळालेले पॅकेज रणजीतसिंह पाटील यांनी पै-पाहुण्यांना वाटप केल्याचा आरोप सहा संचालकांनी केला होता. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, सहा संचालकांनी केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आपण पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा २००५-०६ मध्ये दिला होता. त्यानंतर २०१० ला शासनाकडून पतसंस्थांना पॅकेज आले. आपण संचालकच नसताना पॅकेजचे वाटप कसे करू शकतो, केवळ राजकीय द्वेषातून काहीही आरोप करणे योग्य नाही. या प्रकरणावर आता मला काही बोलायचे नसल्याचेही रणजीतसिंह पाटील यांनी सांगितले.