शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:06 IST

परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योगमुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हास्यास्पद व पदाला न शोभणारे

कोल्हापूर :  ३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरीशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपानंतर डॉ. नवले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. वारणा कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊस परिषदेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नवले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परिषदा घेण्याऐवजी साखरेला, उपपदार्थांना दर कसा जास्त मिळेल ते पाहावे, जेणेकरून शेतकऱ्यांना ३५00 रुपये दर मिळण्याची हमी मिळेल. हे न करता केवळ परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे, त्यांना चिथावण्याचे काम करत असतील, तर राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या पदाला शोभणारे नाही.

शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी भूमिका घेण्याची गरज असताना ते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेचे दर घसरत असताना त्याविषयी निर्णय न घेता परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करण्याची भूमिका घेणे हे मुळातच हास्यास्पद आहे.

साखरेचे भाव कमी कसे राहतील हे पाहायचे, शेतकऱ्यांना उरले सुरलेच मिळेल, अशी एका बाजूला व्यवस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे परिषद घेऊन आपणच शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत, हे दर्शवणे म्हणजे त्यांचा शुद्ध खोटारडेपणा आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर