शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus updates In Kolhapur : सर्व दुकाने सोमवार पासून सुरु, जिल्हा प्रशासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 20:05 IST

CoronaVirus updates In Kolhapur : मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट ९.७ टक्कयांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देसर्व दुकाने सोमवार पासून सुरु, जिल्हा प्रशासनाचा आदेशपॉझीटिव्ह रेट ९.७ टक्के, स्तर ३ मध्ये समावेश

कोल्हापूर : मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट ९.७ टक्कयांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश आता स्तर ३ मध्ये झाला असून अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या तीन महिन्याहून अधिक काळ बंद असलेले सगळे व्यवसाय, दुकाने उद्यापासून खुली होणार आहेत, मात्र काही बाबतीत निर्बंध कडक ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.सध्या जिल्ह्यातील संसर्गाची लाट ओसरत असून ८ ते १४ जूलै या आठवड्यातील सरासरी आरटीपीसीआर पॉझीटिव्ह रेट ९.७ टकक्यांवर आला आहे. तसेच मागील दोन आठवड्यातील संसर्गांचा विचार करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यासाठी सोमवारपासून (दि.१९) स्तर ३ चे निर्बंध लागू करण्याचा तसेच काही बाबींमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यत सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहतील व शनिवारी-रविवारी बंद असतील. अत्यावश्यक सेवा रोज वरील वेळेत सुरू असतील.हे राहील सुरू

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • अत्यावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने व कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, फिरणे, सायकलिंग, खेळ, सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत.
  • रेस्टॉरंट सर्व दिवशी फक्त पार्सल व घरपोच सेवा.
  • चित्रीकरण अलगीकरणाच्या व्यवस्थेसह सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.
  • लग्नसमारंभ २५ माणसात, अंत्यविधी २० माणसांत
  • स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांच्या सभा सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेसह.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.

हे बंद राहील

  • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह.
  • कार्यक्रम मेळावे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर